शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Pune Metro: ‘वन पुणे कार्ड’मुळे एकाच तिकिटावर दोन्ही मेट्रोचा प्रवास; पुणेकरांचा वेळही वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:30 IST

मेट्रो आणि बसचे प्रवास सोयीचे व्हावे यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस सेवेलाही या प्रणालीशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहे

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांना पुणेरी मेट्रो आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) मेट्रोमधून एकाच तिकिटावर प्रवास करता येणार आहे. त्यासाठीची एकत्र तिकीट प्रणालीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू होऊपर्यंत या तिकीट प्रणालीचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महामेट्रोकडून सध्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मार्गांवर मेट्रो सेवा सुरू आहे. आता पीएमआरडीएच्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मे महिन्यात पहिल्या टप्प्यात १२ किलोमीटर मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या असून, उर्वरित मार्ग जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हिंजवडी मेट्रो शिवाजीनगरपर्यंत आल्यानंतर ती जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाशी जोडली जाणार आहे. यासाठी पादचारी पुलाचे काम वेगात सुरू असून, दोन्ही मेट्रो मार्गांमध्ये सुलभ बदल (इंटरचेंज) करता येणार आहे.

दरम्यान, महामेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रो या दोन्ही सेवांसाठी एकच तिकीट प्रणाली लागू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांमध्ये चार ते पाच बैठका पार पडल्या असून, मेट्रो सुरू होईपर्यंत ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. यामुळे प्रवाशांना एकाच कार्ड किंवा तिकिटावर संपूर्ण प्रवास करता येणार आहे.

पीएमपी सेवाही होणार सोयीचे

मेट्रो आणि बसचे प्रवास सोयीचे व्हावे यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस सेवेलाही या प्रणालीशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी महामेट्रो आणि पीएमपी अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बैठक झाली. या बैठकीत मेट्रोसाठी फिडर सेवा वाढविण्यावरही भर देण्यात आला. ‘वन पुणे कार्ड’च्या माध्यमातून मेट्रो आणि बस या दोन्ही सार्वजनिक वाहतूक सेवांचा एकत्रित वापर सुलभ करण्याचा प्रयत्न सुरू असून, यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, तसेच प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

महामेट्रो आणि हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोमधून प्रवाशांना एकाच तिकिटावर प्रवास करता यावा यासाठी तिकीट प्रणाली जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मेट्रो सुरू होईपर्यंत हे काम पूर्ण होईल. तसेच, जिल्हा न्यायालय स्थानकापासून लाईन थ्रीला जोडणाऱ्या मार्गिकेचे कामही सुरू आहे. - श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Metro: One card for both lines saves time.

Web Summary : Pune Metro's Hinjawadi-Shivajinagar line is set to open. Integrated ticketing allows travel on both Pune and MahaMetro lines with one card, saving time. Integration with PMP buses is also planned for seamless travel.
टॅग्स :Puneपुणेpassengerप्रवासीPMPMLपीएमपीएमएलPMRDAपीएमआरडीएticketतिकिटMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार