दीर्घ कालावधीनंतर पुणे दौऱ्यावर; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शहरात रविवारी विविध प्रकल्पांचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 20:38 IST2026-05-16T20:37:29+5:302026-05-16T20:38:37+5:30

महापालिका निवडणुकीत भाजपला पुणेकरांनी भरभरून मते देत ११९ नगरसेवक निवडून दिले, महापालिका निवडणुकीतील यशानंतर मात्र फडवणीस यांचे दौरे कमी झाले आहेत

On a visit to Pune after a long time; Chief Minister Devendra Fadnavis inaugurated various projects in the city on Sunday | दीर्घ कालावधीनंतर पुणे दौऱ्यावर; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शहरात रविवारी विविध प्रकल्पांचे लोकार्पण

दीर्घ कालावधीनंतर पुणे दौऱ्यावर; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शहरात रविवारी विविध प्रकल्पांचे लोकार्पण

पुणे: मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस आज (रविवारी) पुणे शहराच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम होणार आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे वेगवेगळ्या कारणांनी दर आठवड्यात पुणे दौऱ्यावर येत होते. महापालिका निवडणुकीत भाजपला पुणेकरांनी भरभरून मते देत ११९ नगरसेवक निवडून दिले. महापालिका निवडणुकीतील यशानंतर मात्र फडवणीस यांचे दौरे कमी झाले आहेत.

दीर्घ कालावधीनंतर फडणवीस आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते महापालिकेच्या वतीने बाणेर येथे उभारलेल्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाचे लोकार्पण आणि उंड्री, महोम्मदवाडी आणि एनआयबीएम परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा देण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारलेल्या पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण, छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण, कृषी महाविद्यालयात उभारण्यात येणाऱ्या कृषी नवोन्मेष आणि उष्मायन केंद्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन, दुसऱ्या हॅकेथॉन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण आदी कार्यक्रम फडणवीसांच्या हस्ते होणार आहेत.

Web Title : लंबे अंतराल के बाद मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौरे पर, परियोजनाओं का उद्घाटन

Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस लंबे अंतराल के बाद पुणे पहुंचे और विभिन्न परियोजनाओं का उद्घाटन किया। इनमें कैंसर अस्पताल, पानी की टंकियां, एक प्रतिमा का अनावरण और कृषि नवाचार केंद्र की आधारशिला शामिल है, जो नगरपालिका चुनावों के बाद विकास पहलों को दर्शाता है।

Web Title : CM Fadnavis Visits Pune After Long Gap, Inaugurates Projects

Web Summary : After a long gap, CM Fadnavis visits Pune to inaugurate various projects. These include a cancer hospital, water tanks, a statue unveiling, and a groundbreaking ceremony for an agricultural innovation center, showcasing development initiatives after the municipal elections.