पुणे : गुढीपाडवा, दसरा, दिवाळी आणि नववर्षाच्या मुहूर्तावर नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याची बांधकाम क्षेत्रात परंपरा असून, यंदाच्या पाडव्याच्या मुहूर्तावर ४८६ नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. जुन्या प्रकल्पांच्या आराखड्यासह मुदतवाढ आणि काही मंजूर प्रकल्पांतील सुधारणांसह १ हजार ६० प्रकल्पांना महारेराने मंजुरी दिली आहे.
गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी तब्बल २११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात १२४ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्यात आले असून, ५३ प्रकल्पांना मुदतवाढ आणि ३४ प्रकल्पांच्या प्रस्तावातील सुधारणांनाही महारेराने मंजुरी दिली आहे. पाडव्यापर्यंत मंजूर करण्यात आलेल्या या १ हजार ६० प्रकल्पांत ४८६ नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने नोंदणी क्रमांक दिले आहेत. विकासकांनी प्रकल्प पूर्ततेचा आराखडा केलेल्या विनंतीनुसार ४२६ प्रकल्पांचे मुदतवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. शिवाय १४८ जुन्या प्रकल्पांनी काही सुधारणांचे प्रस्ताव सादर केले होते. तेही मंजूर करण्यात आले आहेत.
महारेरा नोंदणी क्रमांक मिळालेल्या प्रकल्पांत मुंबई विभागातील ६०७, पुण्यातील ३२१ प्रकल्प, उत्तर महाराष्ट्रातील ६३, विदर्भातील ५० आणि मराठवाड्यातील १४ आणि दादरा नगर हवेलीमधील ५ प्रकल्पांचा समावेश आहे. प्रकल्पांच्या संख्येत पुणे जिल्ह्याची आघाडी असून, जिल्ह्यात २८६ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्यात १९६, ठाणे १८५, रायगड ११० प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
जिल्हानिहाय मंजुरीचा तपशील
मुंबई महाप्रदेश एकूण ६०७
- मुंबई उपनगर १९६- ठाणे १८५- रायगड ११०- पालघर ५२- मुंबई शहर ४२- रत्नागिरी १४- सिंधुदुर्ग ८
पुणे विभाग एकूण ३२१
पुणे २८६सातारा १६कोल्हापूर १३सांगली ५सोलापूर १
उत्तर महाराष्ट्र एकूण ६३
- नाशिक ४१- अहिल्यानगर १९- जळगाव २- धुळे १
विदर्भ एकूण ५०
- नागपूर ४२- अमरावती ६- चंद्रपूर १- यवतमाळ १
मराठवाडा - एकूण १४
- संभाजीनगर १०- नांदेड २- लातूर १- धाराशिव १
दादरा नगर हवेली - ५
Web Summary : Maharashtra sees 486 new construction projects registered on Gudi Padwa. MahaRERA approved 1,060 projects, including modifications and extensions. Pune leads with the highest number of project approvals, followed by Mumbai.
Web Summary : गुड़ी पड़वा पर महाराष्ट्र में 486 नई निर्माण परियोजनाएं पंजीकृत हुईं। महारेरा ने संशोधन और विस्तार सहित 1,060 परियोजनाओं को मंजूरी दी। पुणे सबसे अधिक परियोजना अनुमोदन के साथ अग्रणी है, जिसके बाद मुंबई है।