शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:59 IST

तेलंगणा विधानसभेने 'तेलंगणा कर्मचारी दायित्व आणि पालकत्व देखरेख विधेयक २०२६' मंजूर केले आहे. हे विधेयक समाजकल्याण मंत्री अडलुरी लक्ष्मण कुमार यांनी सादर केले होते

हैदराबाद - जर एखादा कर्मचारी आपल्या आई वडिलांची देखभाल करत नसेल तर त्याच्या पगारातून पैसे कापून ते आई वडिलांना देण्यात येणार आहेत. तेलंगणा सरकारने याबाबतचा एक कायदा मंजूर केला आहे. आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या कायद्यातंर्गत कर्मचाऱ्याच्या पगारातून १५ टक्के अथवा १० हजारापर्यंत कपात होऊ शकते. हा नियम सरकारी तसेच खासगी कर्मचाऱ्यांना लागू असेल. आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनाही कायद्याच्या कक्षेत घेण्यात आले आहे.

सध्या वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीत बऱ्याचदा आई वडिलांचा सांभाळ न करता त्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाते. ही सामाजिक परिस्थिती लक्षात घेता तेलंगणा सरकारने हा नवीन कायदा आणला आहे. या कायद्यातंर्गत आई वडील थेट मुलाविरोधात तक्रार करू शकतात. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज करावा लागेल आणि त्यांच्या परिस्थितीशी, उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल. जिल्हाधिकारी ६० दिवसांच्या आत या तक्रारीवर निर्णय घेतील. सुनावणीनंतर आदेश जारी करण्यात येईल. त्यानंतर निश्चित केलेली रक्कम थेट आई वडिलांच्या खात्यात मुलाच्या पगारातून कापून दिली जाईल.

हा कायदा सामाजिक बदलामध्ये एक मैलाचा दगड ठरेल असं सरकारने म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण आणि प्रतिष्ठा बळकट करण्याच्या उद्देशाने उचललेल्या एका महत्त्वपूर्ण कायदेशीर पावलाअंतर्गत तेलंगणा विधानसभेने 'तेलंगणा कर्मचारी दायित्व आणि पालकत्व देखरेख विधेयक २०२६' मंजूर केले आहे. हे विधेयक समाजकल्याण मंत्री अडलुरी लक्ष्मण कुमार यांनी सादर केले होते. अध्यक्षांच्या संमतीने मंजूर झालेल्या या विधेयकाचा उद्देश वृद्ध पालकांचे हक्क आणि कल्याण यांचे संरक्षण करण्यासाठी एक कायदेशीर चौकट प्रदान करणे हा आहे.

या कायद्यात काय आहे?

  • हा कायदा कर्मचाऱ्यांवर त्यांच्या पालकांच्या देखभालीच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे परिभाषित करतो. वृद्धांसाठी आरोग्यसेवा, निवास आणि आर्थिक सुरक्षा यांसारख्या अत्यावश्यक बाबी सुनिश्चित करण्यासाठी उत्तरदायित्व अनिवार्य करतो.
  • निष्काळजीपणाच्या प्रकरणांना हाताळण्यासाठी तसेच अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार हस्तक्षेप करण्यास आणि नियमांची अंमलबजावणी करण्यास सक्षम करणारी यंत्रणा स्थापित करण्यासाठी तरतुदींचाही समावेश करण्यात आला आहे.
  • महत्त्वाचे म्हणजे हे विधेयक पालकांना त्यांच्या मुलांकडून पोटगी मागण्याचा अधिकार देते आणि तक्रार निवारणासाठी एक औपचारिक यंत्रणा प्रदान करते.
  • नवीन विधेयकानुसार जे कर्मचारी आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळतील, त्यांच्या एकूण पगारातून त्यांच्या पगाराच्या १५% किंवा ₹१०,००० यापैकी जी रक्कम कमी असेल, ती कापली जाईल. कापलेली रक्कम त्यांच्या पालकांना दिली जाईल.
  • हे विधेयक वृद्धांना सोडून देणे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या वाढत्या चिंतेचे निराकरण करेल तसेच कुटुंब व्यवस्थेची नैतिक आणि सामाजिक रचना मजबूत करेल असा सरकारचा दावा आहे. 

 

दरम्यान, तेलंगणासारखेच केरळ आणि आसाममध्येही असा कायदा पारित झाला आहे. ज्यात केरळमध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून २५ टक्के कापण्याची तरतूद आहे परंतु हा अनुकंपा तत्वावर लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कायदा आहे. आसामध्ये २०१७ साली असा कायदा लागू झाला होता. ज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० ते १५ टक्के कपातीचा नियम होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Telangana: Neglect parents, face salary cuts; new law enacted.

Web Summary : Telangana mandates salary cuts up to 15% for employees neglecting parents. Parents can file complaints, and district collectors will decide within 60 days. The law applies to government and private employees, aiming to protect elderly welfare and family values. Similar laws exist in Kerala and Assam.
टॅग्स :TelanganaतेलंगणाSenior Citizenज्येष्ठ नागरिक