शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:42 IST

बदलेलं काश्मीर पाहून मला आनंद होतो. हे एक नवीन काश्मीर आहे. आज काश्मीर सुधारले आहे. इथे प्रत्येक ठिकाणी समृद्धी आणि पर्यटन वाढले आहे. इथले लोक प्रगत झालेत असं इलियासी यांनी सांगितले.

श्रीनगर - पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होईल असं विधान ऑल इंडिया इमाम ऑर्गनाइजेशनचे मुख्य इमाम उमर अहमद इलियासी यांनी केले आहे. त्यासोबतच कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या बदलांचेही त्यांनी कौतुक केले. 

उमर अहमद इलियासी यांनी म्हटलं की, आज काश्मीर इथं उभं राहून शेजारील राष्ट्राला एकच सांगतो, पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. निश्चितपणे ते भारतात पुन्हा समाविष्ट होईल. पीओकेतील लोकांची जनमत चाचणी करायला हवी. तिथल्या लोकांना भारतासोबत यायचे आहे. ते जम्मू काश्मीरमध्ये होत असलेला विकास पाहताहेत. जर वरंच्यांनी ठरवले तर लवकरच या लोकांची घरवापसी होईल. आज काश्मीर ज्यारितीने पुढे जात आहे ते पाहता पीओके लवकरच भारतातात येईल अशी भविष्यवाणीच त्यांनी केली.

तसेच बदलेलं काश्मीर पाहून मला आनंद होतो. हे एक नवीन काश्मीर आहे. आज काश्मीर सुधारले आहे. इथे प्रत्येक ठिकाणी समृद्धी आणि पर्यटन वाढले आहे. इथले लोक प्रगत झालेत. एक काळ होता जेव्हा इथले युवा आणि लहान मुले दगडफेक करायचे परंतु आज त्या मुलांच्या हातात पुस्तक आले आहे. ते शिक्षण घेत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनात काही काळ घसरण झाली होती. मात्र आता पर्यटकांनी पुन्हा काश्मीरला यायला हवे. इथे दहशतीचे वातावरण नाही. युद्धातून विध्वंस येतो, त्यामुळे संपूर्ण जगात शांतता राहावी असंही उमर अहमद इलियासी यांनी म्हटलं.

जाणून घ्या कोण आहेत उमर अहमद इलियासी ?

उमर अहमद इलियासी  ऑल इंडिया इमाम ऑर्गनाइजेशनचे मुख्य इमाम आहेत. त्यांनी पंजाबच्या भगत युनिवर्सिटीतून पीएचडी पदवी घेतली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मशिदीतील इमामाने इतकी मोठी पदवी मिळवली. इलियासी हे निवडक इस्लामी विद्वानांपैकी एक आहेत जे कट्टरता आणि दहशतवादाविरोधात स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेतात. २०२२ मध्ये दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील एका मशिदीत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर ते प्रकाशझोतात आले. उमर अहमद इलियासी यांनी तर मोहन भागवत यांना 'राष्ट्रपिता' म्हणून संबोधले होते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan-Occupied Kashmir to merge with India soon: Imam Umer Ilyasi predicts.

Web Summary : All India Imam Organization's Imam Umer Ilyasi predicts Pakistan-Occupied Kashmir's merger with India. He lauded Kashmir's progress post-Article 370 repeal, noting improved education and tourism, urging peace.
टॅग्स :POK - pak occupied kashmirपीओकेJammu Kashmirजम्मू-काश्मीर