नीट पेपर फुटीप्रकरण : पुण्यातील महिला आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्याला चौकशीअंती सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 12:38 IST2026-05-15T12:37:58+5:302026-05-15T12:38:19+5:30

NEET paper leak case - सध्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

NEET paper leak case Pune woman and engineering student released after questioning | नीट पेपर फुटीप्रकरण : पुण्यातील महिला आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्याला चौकशीअंती सोडले

नीट पेपर फुटीप्रकरण : पुण्यातील महिला आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्याला चौकशीअंती सोडले

पुणे : देशभरात गाजत असलेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील पुणे कनेक्शन समोर आल्यानंतर तपासादरम्यान महिला मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे आणि विद्यार्थ्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाले होते का, याचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशीनंतर वाघमारे आणि शेषराव सोळंकी याला सोडून दिले असले, तरी गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सध्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नीट पेपर फुटीप्रकरणात सीबीआयने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथून धनंजय लोखंडे (वय २६) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या संपर्कातील पुणे कनेक्शन उघड झाले होते. त्यानुसार बिबवेवाडीतील ब्युटी पार्लर चालविणारी महिला मनीषा वाघमारे आणि अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणाऱ्या शेषराव सोळंकी या विद्यार्थ्याला पुणे पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोघांनाही सीबीआयच्या हवाली करण्यात आले होते. तपासादरम्यान लोखंडे, वाघमारे आणि विद्यार्थ्यांमध्ये काही आर्थिक व्यवहार झाले होते का, याचा तपास सीबीआयकडून सुरू आहे.

संबंधितांच्या मोबाइल फोनमधील माहिती, बँक व्यवहार आणि संदेशांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, वाघमारेच्या बँक खात्यात नीट परीक्षेच्या कालावधीत काही आर्थिक व्यवहार झाल्याचे आधीच्या तपासात समोर आले होते. तसेच, काही संदेश मोबाइलमधून हटविण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक साखळी आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारे नेटवर्क उघड करण्यासाठी सीबीआयकडून सखोल तपास सुरू आहे.

Web Title : नीट पेपर लीक: पूछताछ के बाद पुणे की महिला, इंजीनियरिंग छात्र रिहा

Web Summary : नीट पेपर लीक में पुणे कनेक्शन की जांच। सीबीआई ने एक महिला और छात्र से पूछताछ की और रिहा कर दिया, लेकिन उन्हें फिर से बुला सकती है। वित्तीय लेनदेन की जांच चल रही है, मोबाइल डेटा और बैंक विवरण की जांच की जा रही है। नेटवर्क का पता लगाने के लिए जांच जारी है।

Web Title : NEET Paper Leak: Pune Woman, Engineering Student Released After Questioning

Web Summary : Pune connection in NEET paper leak investigated. CBI questioned and released a woman and student but may recall them. Financial transactions are under scrutiny, with mobile data and bank details being examined. The investigation continues to uncover the network.