NEET Exam Paper Leak: मोबाईलमध्ये पेपरफुटीचे पुरावे; डॉक्टर-इंजिनिअर बनवणारा क्लासमालक शिवराज मोटेगावकर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 15:06 IST2026-05-18T15:06:13+5:302026-05-18T15:06:23+5:30
NEET Exam Paper Leak मोटेगावकर सरांच्या क्लासच्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षेत उत्तम गुण मिळत असल्याने त्यांचा हा क्लास राज्यभरात लोकप्रिय झाला होता

NEET Exam Paper Leak: मोबाईलमध्ये पेपरफुटीचे पुरावे; डॉक्टर-इंजिनिअर बनवणारा क्लासमालक शिवराज मोटेगावकर अटकेत
पुणे : पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकर क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. रात्रभर तब्बल ११ तास सीबीआय कार्यालयात मोटेगावकरांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर अखेर मोटेगावकर यांना सीबीआयडून अटक करण्यात आली आहे. राज्यभरात मोटेगावकर यांच्या आरसीसी कोचिंग क्लासेसच्या शाखा आहेत. डॉक्टर-इंजिनिअर बनवणारा क्लासमालक म्हणून मोटेगावकर सरांची ओळख आहे
क्लालेसच्या विद्यार्थ्यांचीही आता सीबीआयकडून चौकशी सुरु करण्यात येत आहे. गेल्या काही तासांपासून काही पालक त्यांच्या पाल्यांसोबत सीबीआय कार्यालयात आले आहेत. विद्येच्या माहेरघरातच या प्रकरणात प्रसिद्ध क्लासच्या प्राध्यापकांची चौकशी होत असल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. मोटेगावकर क्लासेस मधून असंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. अनेक विद्यार्थी या क्लासमुळे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र आता या पेपर फुटी प्रकरणात खुद्द संचालकांनाच इतके केल्याने शिक्षण वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मोटेगावकर सरांच्या क्लासच्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षेत उत्तम गुण मिळत असल्याने त्यांचा हा क्लास राज्यभरात लोकप्रिय झाला होता. अनेक पालक आपल्या मुलांना प्रचंड शुल्क भरुन या क्लासला घालत होते. आता याच मोटेगावकर सरांना नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या क्लासकडे डॉक्टर आणि इंजिनिअर घडवणारी फॅक्टरी म्हणून पाहिले जायचे. राज्यभरात आरसीसीच्या शाखा पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि अकोला यांसह अनेक शहरांत विस्तारल्या आहेत. नीट पेपरफुटीत मोटेगावकरांचे पी.व्ही.कुलकर्णीसोबत मोटेगावकरचे घनिष्ठ संबंध होते. त्यांनी मोटेगावकरने परीक्षेपूर्वीच प्रश्न मिळवून उत्तरांसह मुलांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये पेपरफुटीचे अनेक पुरावे समोर आले आहेत. सीबीआयकडून मोबाईलमधील डेटा, चॅट्स, कॉल रेकॉर्ड्सचा शोध सुरु आहे.