शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या बदल्यात नाशिक लढवणार?; भुजबळांच्या भेटीआधी अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 15:01 IST

राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून सातारा लोकसभा मतदारसंघावरून निर्माण झालेला तिढाही सुटण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्याची जागा भाजपच्या उदयनराजे भोसले यांना सोडून त्याबदल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ हे आज पुण्यात अजित पवारांची भेट घेणार असल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी जागावाटपावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सातारा आणि नाशिकच्या जागेची अदलाबदल करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेत तथ्य आहे का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, "महायुतीचे प्रमुख नेते उद्या पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करणार आहेत. काल आमच्या पक्षाची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. मात्र छगन भुजबळ हे परवा आजारी होते आणि काल ते दुसऱ्या कामामुळे येऊ शकले नाहीत. त्यामुळे आज ते मला भेटण्यासाठी येत आहेत. जागावाटपावर आम्ही उद्याच आमची भूमिका जाहीर करू," असं अजित पवारांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून महायुतीचे जास्तीत जास्त खासदार कसे निवडून जातील, यासाठी आम्ही आखणी करतोय, प्रयत्न करतोय आणि लोकांना आवाहन करतोय, असंही अजित पवार म्हणाले.

साताऱ्याच्या बदल्यात का सुरू आहे नाशिकची चर्चा?

मागील लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. श्रीनिवास पाटील सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असले तरी या जागेवर आमचा हक्क असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीच्या जागावाटपात या जागेवर दावा सांगितला आहे. मात्र भाजपही उदयनराजेंसाठी ही जागा सुटावी यासाठी आग्रही असून साताऱ्याच्या बदल्यात अजित पवारांना उत्तर महाराष्ट्रातील जागा सोडली जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

आमची हक्काची साताऱ्याची जागा तुम्हाला हवी असेल तर आम्हाला नाशिकची जागा द्या, अशी मागणी अजित पवारांच्या पक्षाने केल्याचे समजते. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे हेमंत गोडसे हे मागील दोन टर्मपासून खासदार आहेत. मात्र या लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार असल्याने भाजपकडूनही नाशिकच्या जागेवर दावा सांगितला जात आहे. नाशिकवरून आधीच शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीनेही या जागेची मागणी केली असून याबाबत नक्की काय निर्णय घेतला जातो, हे उद्या स्पष्ट होणार आहे.
 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारChhagan Bhujbalछगन भुजबळnashik-pcनाशिकPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४