"काँग्रेसने कष्टाने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले", नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 15:20 IST2021-07-23T15:11:49+5:302021-07-23T15:20:04+5:30

देश लुटणाऱ्या मोदी सरकारची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा असेही आवाहन

Nana Patole alleges that the Modi government has started rob the country which was built by the Congress | "काँग्रेसने कष्टाने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले", नाना पटोलेंचा आरोप

"काँग्रेसने कष्टाने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले", नाना पटोलेंचा आरोप

ठळक मुद्देकाँग्रेसकडून ७० वर्षात सत्तेचा वापर नेहमीच सामान्यांसाठी समितीच्या सदस्यांनी आता पुन्हा सक्रिय होण्याची वेळ

पुणे : काँग्रेसने कष्टाने मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार मोडायलाच नाही तर लुटायला निघाले आहे. सनियंत्रण समितीच्या सदस्यांंनी जनतेत तळापर्यंत जाऊन याची माहिती द्यावी असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. 

काँग्रेस सरकारने केलेल्या योजनांच्या प्रचारासाठी स्थापन केलेल्या योजना संनियंत्रण समितीचे पटोले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी पुण्यात पुनरुज्जीवन करण्यात आले. आमदार शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश बागवे, समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी व अन्य प्रदेश पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

पटोले म्हणाले, समितीच्या सदस्यांनी आता पुन्हा सक्रिय होण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने ७० वर्षात देशाची बांधणी केली. सत्तेचा वापर नेहमीच सामान्यांसाठी केला. भाजपा मोदी सरकारच्या माध्यमातून हे सगळे मोडीत काढत आहे. देशाला लुटत आहेत याची माहिती समितीच्या सदस्यांनी जनसेवक होऊन जनतेला द्यावी.
संयोजक देशमूख यांनी समितीची आताच्या काळात खरी गरज आहे असे सांगितले. पटोले यांनी राज्यातून आलेल्या सर्व समिती पदाधिकार्यांची वैयक्तिक ओळख करून घेतली

Web Title: Nana Patole alleges that the Modi government has started rob the country which was built by the Congress