शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
4
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
5
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
6
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
7
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
8
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
9
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
10
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
12
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
13
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
14
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
15
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
16
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
17
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
18
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
19
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
20
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या हातावरच लिहिले ‘नेल कट’; ‘मेरा बाप चोर है’ गोंदलेल्या सीनची आठवण, पुण्यातील 'या' शाळेतील शिक्षिकेचा अजब प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 09:46 IST

पुण्यातील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेने छोट्या मुला-मुलींच्या हातावर भल्या मोठ्या अक्षरात ‘नेल कट’ असे पेनाने लिहून त्यांना मैदानावर पळत चार चक्कर मारण्याच्या सूचना केल्या

पुणे : दिवार चित्रपटातील अभिताभ बच्चनच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ गोंदलेला सीन आठवतोय, अगदी त्याच स्टाईलमध्ये एका शिक्षिकेने छोट्या मुला-मुलींच्या हातावर भल्या मोठ्या अक्षरात ‘नेल कट’ असे पेनाने लिहून त्यांना मैदानावर पळत चार चक्कर मारण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे मुले प्रचंड घाबरली आणि आपला हात कोणी पाहू नये यासाठी दिवसभर हात लपवत त्यांनी शाळेतील दिवस काढला.

धनकवडी परिसरातील अनंत निर्मल ग्लोबल स्कूलमध्ये ही घटना बुधवारी घडली. याबाबत काही पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिकांना लेखी तक्रार केली. परंतु मुख्याध्यापिकांकडून संबंधित शिक्षिकेला तोंडी सूचना देण्याव्यतिरिक्त कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती अशी की, धनकवडी परिसरात अनंत निर्मल ग्लोबल स्कूल ही मोठी शाळा आहे. पहिली दुसरीच्या मुलांसाठी येथे ३० ते ४० हजार रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे मुलांना प्रशिक्षित, मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास असणारे शिक्षक असल्याची पालकांची अपेक्षा आहे. सकाळी आठ वाजता शाळा भरली. त्यानंतर काही वेळात येथील क्रीडा शिक्षकांनी मुलांची शिस्तीची तपासणी केली. ज्या मुलांची नखे वाढली आहेत त्यांचा हात पकडून त्यावर मोठ्या अक्षरात ‘नेल कट’ असे लिहिले व ज्या मुलांनी केस कापले नाही, नखे कापली नाहीत त्यांना शाळेच्या क्रीडांगणाची पळत चार चक्कर मारायची शिक्षा दिली.

हातावर पेनाने लिहिलेल्या ‘नेल कट’ अक्षरांमुळे चिमुकली मुले प्रचंड अस्वस्थ होती. त्यामुळे दुपारी पालक आल्यानंतर त्यांना रडवेल्या तोंडाने हात दाखविला, आम्हाला या शाळेत पाठवू नका प्लीज अशी विनवणी केली, त्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला. पालकांनी मुख्याध्यापिकांकडे तक्रार केली, परंतु त्यांनी याबाबत सारवासारवीची उत्तरे देत पालकांना पाठवून दिले.

प्रत्येक क्लासमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. त्यावर शिक्षकांकडून नियमित सूचना येतात, शिवाय मुलांच्या बॅगमध्ये नोटीस डायरी सुद्धा आहे, त्याचे पैसे शाळेने घेतले आहेत. त्या डायरीत नोटीस लिहिणे गरजेचे होते, विद्यार्थ्यांच्या हातावर अशी सूचना दिल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. शाळेवर कारवाई झाली पाहिजे. - पालक

पालकांची तक्रार आल्यानंतर आम्ही संबंधित शिक्षिकेला तोंडी सूचना केल्या आहेत, शाळा सुटताना हा प्रकार झाला होता, याबाबत संस्थेला घटनेची माहिती देऊन पुढील कारवाई करण्यात येईल. -मनिषा धावडे, मुख्याध्यापिका
 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune school teacher writes 'Nail Cut' on students' hands as punishment.

Web Summary : A Pune teacher punished students with long nails by writing 'Nail Cut' on their hands and making them run laps. Parents complained, citing emotional distress. The headmistress issued a verbal warning.
टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळाSocialसामाजिकexamपरीक्षाProfessorप्राध्यापकDhankawadiधनकवडी