Mumbai Pune Expressway Traffic : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवरील अपघाताचा फटका एसटी सेवेला; 139 बस फेऱ्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 19:34 IST2026-02-04T19:33:23+5:302026-02-04T19:34:28+5:30

- या घटनेमुळे राज्यभरातील एकूण 139 एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai Pune Expressway Traffic Accident on Pune-Mumbai Expressway hits ST service; 139 bus routes cancelled | Mumbai Pune Expressway Traffic : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवरील अपघाताचा फटका एसटी सेवेला; 139 बस फेऱ्या रद्द

Mumbai Pune Expressway Traffic : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवरील अपघाताचा फटका एसटी सेवेला; 139 बस फेऱ्या रद्द

पुणे -पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस सेवांवर झाला आहे. या घटनेमुळे राज्यभरातील एकूण 139 एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये 73 ई-शिवनेरी तसेच 66 इतर एसटी बस फेऱ्यांचा समावेश आहे. अचानक निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

या अपघातानंतर एक्सप्रेस वेवर एसटी महामंडळाची 163 वाहने अडकून पडली होती. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर 36, पुणे 20, सांगली 18, कोल्हापूर 13, पालघर 12, ठाणे 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, पर्यायी मार्ग व सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर एसटी बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर दुर्घटना से एसटी बस सेवा बाधित; 139 फेरियां रद्द

Web Summary : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर टैंकर दुर्घटना से यातायात बाधित हुआ, जिससे महाराष्ट्र में 139 एसटी बस फेरियां रद्द कर दी गईं। 163 एसटी वाहन फंसे रहे, जिससे यात्रियों को परेशानी हुई। प्रशासन यात्रियों की सुरक्षा को प्राथमिकता दे रहा है और यातायात सामान्य होने पर सेवाएं बहाल करेगा।

Web Title : Mumbai-Pune Expressway Accident Disrupts ST Bus Services; 139 Trips Canceled

Web Summary : A tanker accident on the Mumbai-Pune Expressway caused major traffic disruptions, leading to the cancellation of 139 ST bus trips across Maharashtra. 163 ST vehicles were stranded, impacting travelers significantly. Authorities prioritize passenger safety and are working to restore services gradually as traffic clears.