शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

'कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 18:38 IST

पुढील आदेश येईपर्यंत वीज तोडणी थांबवण्याचे निर्देश प्रशासनाने महावितरणला दिल्याने नवीन उपक्रम

बारामती: पुढील आदेश येईपर्यंत वीज तोडणी थांबवण्याचे निर्देश प्रशासनाने महावितरणला दिल्याने क्षेत्रीय कार्यालयांनी तोडून नाही, तर हात जोडून वसुली करण्यास सुरूवात केली आहे. बारामती परिमंडलात ज्या ६१२ गावांमध्ये ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम राबवला आहे. त्या गावात शेतीपंपाच्या वसुलीला शेतकरी स्वत:हून प्रतिसाद देत आहेत. त्या जोरावरच महावितरणने ९१ कोटींचा टप्पा सुद्धा गाठला आहे. शिवाय गावातून वसूल झालेल्या ३३ टक्के रकमेतूनही विजेची कामे तातडीने करण्यास व प्रलंबित कृषी जोडण्या देण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. दोन महिन्यात ७ हजार ८९६ कृषी जोडण्या देण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून बारामती परिमंडलात ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. नियोजनपूर्वक गावात जाऊन तेथील ग्रामस्थांच्या विजेच्या समस्या, वीजबिलाच्या तक्रारी निवारण्याचे काम या उपक्रमाने केले आहे. याची पोचपावती म्हणून या ६१२ गावांमध्ये ‘महा कृषी ऊर्जा अभियानां’तर्गत वीजबिल वसुलीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. हे अभियान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरणतर्फे गावात शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन, त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मिळणाऱ्या सवलतीची माहिती दिली जात आहे. एकूण थकबाकीच्या साधारणत: ६६ टक्के इतकी सवलत थकीत बिलावर मिळत आहे.

बारामती परिमंडलात आतापर्यंत ५६ हजार ३८९ शेतकऱ्यांनी थकबाकी व चालूबिलापोटी ९१ कोटी ३८ लाखांचा भरणा केला. त्यांना सवलतीपोटी तब्बल ६८ कोटी ५४ लाखांची माफी मिळालेली आहे. मार्च महिन्यात वीज न तोडता वसुलीला गती देण्यासाठी मुख्य अभियंता पावडे यांनी सर्व वीज कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी एक गाव, एक दिवस उपक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या गावातील शेतकऱ्यांनी वीजबिलाचा भरणा केला आहे, तिथे ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार रोहित्र दुरुस्ती, क्षमता वाढवणे, नवीन कनेक्शन देणे यांसह यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्यास सांगितले आहे. वसुलीच्या 'कृषी आकस्मिक निधी' तून काम करण्यासाठी नामिका प्रविष्ठ ठेकेदारांना कामे दिली जात आहेत. त्या-त्या गावात अशी कामे सुरु झाल्याने शेतकऱ्यांनीही ‘माझे वीजबिल, माझी जबाबदारी’ म्हणत आपले कर्तव्य पार पाडण्यास सुरुवात केली आहे. एकाच रोहित्रावरील ८ शेतकऱ्यांनी,भरले साडेपाच लाख 

भोर तालुक्यातील भांबवडे गावच्या गरुड रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी बुधवारी एकत्र येत त्यांच्या १२ लाख रुपये थकबाकीपोटी साडेपाच लाखांचा एकर कमी भरणा केला. त्यांचे ६.५ लाख माफ झाले. त्याबरोबरच त्यांच्या रोहित्राची संपूर्ण दुरुस्तीचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त भारापोटी नवीन रोहित्राचेही नियोजन केले जाणार आहे. महावितरणच्या या तत्परतेबद्दल सर्व शेतकऱ्यांनी महावितरणला धन्यवाद दिले आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीmahavitaranमहावितरणelectricityवीजState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवारNitin Rautनितीन राऊत