आईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खून; काळेपडळ पोलिसांकडून सहा जण गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:18 IST2026-05-14T13:16:48+5:302026-05-14T13:18:40+5:30

Pune Crime - खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार दुर्वांग मानकर हा सराईत आहे. त्याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल

Mother's boyfriend murdered by young woman's boyfriend; Six arrested by Kalepadal police | आईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खून; काळेपडळ पोलिसांकडून सहा जण गजाआड 

आईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खून; काळेपडळ पोलिसांकडून सहा जण गजाआड 

पुणे : प्रेमसंबंध तोडण्यासाठी तरुणीच्या आईच्या प्रियकराने टाकलेला दबाब आणि धमकीमुळे त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. काळेपडळ पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरासह साथीदारांना अटक केली. या प्रकरणात अटकेत असलेला प्रियकर हा सराईत आहे. दुर्वांग उर्फ पारस सुनील मानकर (वय २१, रा.हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता), पारस किशोर गायकवाड (वय २१, रा.दत्तवाडी, सिंहगड रस्ता), अभिजित उर्फ अभी संजय इंगळे (वय २२), सोमनाथ रमेश दोरकर (वय २१), साहिल सागर शेलार (वय २४, सर्व रा.हडपसर) आणि चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय २०, रा.सुखसागरनगर, कात्रज) यांना अटक करण्यात आली. गणेश संजू बिरादार (वय २५, रा.ससाणेनगर, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे.

खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार दुर्वांग मानकर हा सराईत आहे. त्याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. दुर्वांग याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, तर गणेश याचे दुर्वांगच्या प्रेयसीच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. गणेश विवाहित होता. दुर्वांगची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने गणेशने तरुणीला त्याच्याशी प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. त्याने तिच्यावर दबाब आणला होता. त्याने तरुणीच्या आईला याबाबतची माहिती दिली. या कारणावरून दुर्वांग आणि गणेश यांच्यात वाद झाले होते.

दि. ३ मे रोजी हडपसरमधील ससाणेनगर भागात रात्री साडेदहाच्या सुमारास गणेश थांबला होता. त्यावेळी आरोपी दुर्वांग आणि साथीदार तेथे आले. त्यांनी गणेश यास शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. गणेश याच्या डोक्यात सीमेंटचा गट्टू घालून आरोपी पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या गणेश याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली. पसार झालेल्या आरोपींना सापळा लावून वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलिस उपायुक्त डाॅ.सागर कवडे, एसीपी अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, साहाय्यक निरीक्षक अमित शेटे, अजय हंचाटे, हवालदार प्रवीण काळभोर, नीलेश देसाई, प्रतीक लाहिगुडे, दाऊद सय्यद, परशुराम पिसे, राजू वाघमारे, शाहिद शेख, बालू ठाकूर, राकेश साळुंके आणि अतुल पंधरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title : माँ के प्रेमी की बेटी के बॉयफ्रेंड ने की हत्या; छह गिरफ्तार

Web Summary : हडपसर में एक लड़की पर रिश्ता तोड़ने का दबाव डालने पर एक व्यक्ति की हत्या कर दी गई। लड़की के बॉयफ्रेंड ने पांच साथियों के साथ मिलकर अपराध किया। मुख्य आरोपी का आपराधिक रिकॉर्ड है। सभी छह पुलिस द्वारा गिरफ्तार।

Web Title : Mother's lover murdered by daughter's boyfriend; six arrested.

Web Summary : In Hadapsar, a man was murdered because he pressured a girl to end her relationship. The girl's boyfriend, with five accomplices, committed the crime. The main accused has a criminal record. All six are arrested by police.