शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार; पाप लपवण्यासाठी बालविवाह, चाकणमधील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 19:16 IST

विवाहानंतर तिच्यावर जबरदस्ती करून मारहाण केली, अखेर त्रासाला कंटाळून मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली

चाकण: खेड तालुक्यातील चाकण परिसरातून माणुसकीला काळिमा लावणारी आणि नातेसंबंधांना काळोखी छाया देणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या चुलतभावानेच तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. हे कृत्य लपवण्यासाठी संबंधित अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने बालविवाह लावण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी मुख्य आरोपीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

किशोर गंगाधर वाईकर (रा. कांची इन्क्लेव्ह, चाकण), अविनाश बाळासाहेब गोडे (रा. भेंडा, नेवासा, जि. अहिल्यानगर), गंगाधर चिमाजी वाईकर (रा. चाकण), आण्णा मोरकर (रा. भेंडा, नेवासा) यांसह अन्य तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी नोव्हेंबर २०२५ मध्ये आरोपी किशोर वाईकर याच्या घरी त्याच्या गरोदर पत्नीची देखभाल करण्यासाठी आली होती. मात्र, या काळातच किशोरने तिचा विश्वासघात करत फोटो व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या अत्याचारातून पीडिता गरोदर राहिल्यानंतर प्रकरण उघड होण्याच्या भीतीने आरोपीने डॉक्टरांना खोटी माहिती देत गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणल्याचा आरोप आहे. घटना लपवण्यासाठी आरोपीने आपल्या मेहुण्यासोबत म्हणजेच अविनाश गोडे याच्याशी पीडितेचा बेकायदेशीर बालविवाह लावला. २७ जानेवारी २०२६ रोजी चाकणमधील एका रेस्टॉरंटमध्ये हा विवाह पार पडल्याचे समोर आले आहे. विवाहानंतरही पीडितेचे हाल थांबले नाहीत. पत्नी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही पतीने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. विरोध केल्यास तिला मारहाण करण्यात येत होती. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने धाडस दाखवत पोलीस ठाण्यात धाव घेतली. उत्तर चाकण पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संगीता कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Chakan: Minor Girl Abused by Cousin, Forced into Child Marriage

Web Summary : A shocking incident in Chakan reveals a cousin's repeated abuse of a minor girl. To conceal the crime, she was forced into child marriage. Police have filed charges against seven individuals, including the main perpetrator, under POCSO and child marriage laws.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याChakanचाकणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाArrestअटकmarriageलग्न