लष्करी अधिकार्‍याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 23:09 IST2021-04-18T23:09:29+5:302021-04-18T23:09:39+5:30

नायक लष्कराच्या वैद्यकीय महाविद्याालयात ब्रिगेडिअर होते. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ते मोटारीतून बाहेर पडले. त्यांच्याबरोबर चालक होता

Military officer commits suicide by jumping under train | लष्करी अधिकार्‍याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

लष्करी अधिकार्‍याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

विवेक भुसे

पुणे : लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) ब्रिगेडिअर दर्जाच्या अधिकार्‍याने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. 
अनंत नायक (मुळ रा. भुवनेश्वर) असे आत्महत्या केलेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. पुणेरेल्वे स्थानक परिसरात रविवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 

नायक लष्कराच्या वैद्यकीय महाविद्याालयात ब्रिगेडिअर होते. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ते मोटारीतून बाहेर पडले. त्यांच्याबरोबर चालक होता. पुणे रेल्वे स्थानक परिसरात त्यांनी मोटारचालकाला थांबण्यास सांगितले. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास उद्यान एक्सप्रेसखाली नायक यांनी उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.  नायक यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पाहणी करण्यात आली.  त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Military officer commits suicide by jumping under train