नसरापूर नराधमाच्या आधीच्या गुन्ह्यातील हलगर्जीपणाची सखोल चौकशी व्हावी; मेधा कुलकर्णी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:18 IST2026-05-04T13:17:55+5:302026-05-04T13:18:24+5:30

या प्रकरणाच्या अंती न्याय मिळवण्यासाठी, ‘शक्ती’ कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात सरकार दरबारी गंभीर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन कुलकर्णी यांनी दिले

Medha Kulkarni demands a thorough investigation into the negligence in the previous crime of Nasrapur murder. | नसरापूर नराधमाच्या आधीच्या गुन्ह्यातील हलगर्जीपणाची सखोल चौकशी व्हावी; मेधा कुलकर्णी यांची मागणी

नसरापूर नराधमाच्या आधीच्या गुन्ह्यातील हलगर्जीपणाची सखोल चौकशी व्हावी; मेधा कुलकर्णी यांची मागणी

धायरी : पुण्यातील एका गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. पीडित कुटुंबियांची मागणी ही केवळ आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी हीच आहे, असे स्पष्ट करत त्यांनी राज्य सरकारकडे कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

‘हा नराधम यापूर्वीही अशाच कृत्यात सहभागी होता, त्याला पूर्वीच बाहेर पडू द्यायला नको होते. याआधीच्या गुन्ह्यात काही हलगर्जीपणा झाला आहे का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे,’ असे प्रतिपादन त्यांनी केले. या प्रकरणातील कायदेशीर बाजू भक्कम करण्यासाठी आपण वकील उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा केली असून, मुख्यमंत्र्यांशीही या विषयावर संवाद साधला आहे, असे त्यांनी सांगितले.

आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवर भाष्य करताना, ‘आंदोलन करणाऱ्या सामान्य नागरिकांवर कोणतेही ठपके ठेवू नका,’ असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय नेत्यांनी घटनास्थळी जाऊन फोटो काढण्याच्या प्रवृत्तीवरही त्यांनी टीका केली आणि पित्याची अस्वस्थता पूर्णपणे रास्त असल्याचे म्हटले. या प्रकरणाच्या अंती न्याय मिळवण्यासाठी, ‘शक्ती’ कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात आपण लवकरच सरकार दरबारी गंभीर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिले.

Web Title : नसरापुर अपराध: मेधा कुलकर्णी ने पिछले अपराध में लापरवाही की जांच की मांग की।

Web Summary : सांसद मेधा कुलकर्णी ने नसरापुर के अपराधी के पिछले अपराध में लापरवाही की गहन जांच की मांग की। उन्होंने परिवार की मृत्युदंड की मांग का समर्थन किया और पुलिस कार्रवाई पर सवाल उठाया, 'शक्ति' कानून के माध्यम से न्याय दिलाने का वादा किया।

Web Title : Nasrapur Crime: Probe Negligence in Previous Offense, Demands Medha Kulkarni.

Web Summary : MP Medha Kulkarni demands a thorough probe into negligence in the Nasrapur criminal's past. She supports the family's call for the death penalty and questions police action, promising to pursue justice through the 'Shakti' law.