NEET Exam Paper Leak: मनीषा मांढरेंचे निलंबन! मॉडर्नच्या प्राचार्यांनी राजीनामा द्यावा, नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 13:47 IST2026-05-19T13:46:32+5:302026-05-19T13:47:18+5:30

NEET Exam Paper Leak वारंवार होणाऱ्या पेपरफुटी प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, आंदोलकांची मागणी

Manisha Mandhare's suspension! Modern principal should resign students are very happy about the NEET paper leak case | NEET Exam Paper Leak: मनीषा मांढरेंचे निलंबन! मॉडर्नच्या प्राचार्यांनी राजीनामा द्यावा, नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतोष

NEET Exam Paper Leak: मनीषा मांढरेंचे निलंबन! मॉडर्नच्या प्राचार्यांनी राजीनामा द्यावा, नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतोष

पुणे : लाखाे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्यांमध्ये शिक्षकांचे हात गुंतल्याचे नीट पेपरफुटी प्रकरणातून उघड झाले आहे. यात शहरातील माॅडर्न महाविद्यालयाची शिक्षिका मनीषा मांढरे हिला सीबीआयने अटक केली आहे. यावरून नेटीझन्सने माॅडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबाेटे आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल करत पेपर फुटीचे धागेदाेरे शाेधणे सुरू केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष असून, विद्यार्थी काँग्रेसने माॅडर्न महाविद्यालयाच्या गेटवर आंदाेलन करीत निषेध नोंदविला, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका सभागृहात आंदाेलन करीत या प्रकरणाकडे लक्ष वेधले. यावेळी प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांनी पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान, सीबीआयने खासगी क्लासचालक शिवराज माेटेगावकर यांंना साेमवारी अटक करण्यात आली. सीबीआयने पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षिका मनीषा मांढरे यांना अटक केली आहे. यानंतर मॉडर्न कॉलेजने बचावात्मक भूमिका घेत हात झटकण्याचा प्रयत्न केला असून, प्राचार्य निवेदिता एकबोटे जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे.

मनीषा मांढरे या २४ वर्षांपासून या महाविद्यालयात शिक्षिका म्हणून काम करीत आहेत. त्या पाच ते सहा वर्षांपासून राष्ट्रीय परीक्षा संस्थेशी (एनटीए) जोडलेल्या आहेत. गाेपनीयतेमुळे एनटीए आणि टीचर असे थेट कम्युनिकेशन हाेते. त्यामुळे कॉलेज म्हणून आम्हाला याबाबत माहिती नव्हती, असे प्राचार्या एकबाेटे सांगत आहेत. मात्र, डॉ. निवेदिता एकबोटे या भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. सीबीआयने अटक केलेल्या राजस्थानच्या दिनेश बिवल यांचाही भाजयुमोशी संबंध आहे, यावरून धागेदाेरे सापडतात, असा आराेप नेटीझन्सकडून केला जात आहे. या प्रकरणातील संपूर्ण सत्य सीबीआयने समोर आणून गुन्हेगारांवर कठोर शिक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी हाेत आहे.

दाेषींना माफी नकाेच...

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना माफी नको, पेपरफुटी करणाऱ्यांना तत्काळ अटक करा, शिक्षण वाचवा-विद्यार्थ्यांना न्याय द्या, अशा घोषणा देत भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना अर्थात ‘एनएसयूआय’ने साेमवारी माॅडर्न महाविद्यालयासमाेर तीव्र आंदाेलन केले. यात प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे, अध्यक्ष सागर साळुंखे, संकेत कुलट, अभिजित गोरे, कृष्णा साठे यांच्यासह अनेक विद्यार्थी सहभागी झाले हाेते. पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदाेलकांना ताब्यात घेतले असता विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. नीट पेपरफुटी प्रकरणात मनीषा मांढरे या एकट्याच दोषी नसून, या रॅकेटमध्ये मॉडर्न कॉलेजमधील आणखी काही लाेकांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी. चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवेदिता एकबोटे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ प्राचार्य पदाचा राजीनामा द्यावा, अथवा त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अक्षय कांबळे यांनी केली.

आंदाेलकांच्या मागण्या...

- वारंवार होणाऱ्या पेपरफुटी प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
- नीट पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी.
- या प्रकरणात सहभागी सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून अटक करावी.
- राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) परीक्षा प्रक्रियेमध्ये तातडीने व्यापक सुधारणा कराव्यात.

मनीषा मांढरेवर ‘माॅडर्न’कडून निलंबनाची कारवाई

शिवाजीनगर येथील मॉडर्न कला-विज्ञान-वाणिज्य महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कनिष्ठ विभागातील शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे या २००२ पासून संस्थेत कार्यरत आहेत. नीट परीक्षेसंदर्भातील काही गोपनीय कामकाजासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीविषयी संस्था व मॉडर्न महाविद्यालयाचा दुरान्वयानेही संबंध नाही. त्यांचे कार्य पूर्णतः गोपनीय स्वरूपाचे असून, संबंधित व्यक्ती आणि एनटीए यांच्यामधील पत्रव्यवहार व सूचना थेट हाेत होत्या. तरीही नीट पेपरफुटी प्रकरणात मांढरे यांना अटक झाल्याचे कळताच संस्थेच्या नियामक मंडळाने सोमवारी (दि. १८) तातडीने बैठक घेतली. बैठकीत मनीषा मांढरे यांंच्यावर महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ (एमईपीएस) कायद्यातील ३३ (५) या नियमानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निलंबनाबाबत शिक्षण आयुक्त, शिक्षण उपसंचालक यांनाही कळविण्यात आले आहे. याशिवाय चौकशीसाठी सीबीआयला सर्वताेपरी सहकार्य करण्यात येईल, असे कार्यवाह, सहकार्यवाह आणि प्राचार्यांनी पत्रक काढून कळविले आहे.

Web Title : NEET पेपर लीक: शिक्षिका निलंबित, प्रिंसिपल पर इस्तीफे का दबाव

Web Summary : NEET पेपर लीक में शिक्षिका की संलिप्तता उजागर। मनीषा मांढरे निलंबित; प्रिंसिपल निवेदिता एकबोटे के इस्तीफे की मांग। अधिकारियों के भाजपा से संबंध के आरोप। छात्रों ने गहन जांच और जवाबदेही की मांग की।

Web Title : NEET Paper Leak: Teacher Suspended, Principal Under Pressure to Resign

Web Summary : NEET paper leak exposes teacher involvement. Manisha Mandhare suspended; protests demand principal Nivedita Ekbote's resignation. Allegations link officials to BJP. Students demand thorough investigation and accountability for those jeopardizing futures.