शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
3
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
4
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
5
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
6
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
7
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
8
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
9
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
10
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
11
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
12
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
13
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
14
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
15
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
16
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
17
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
18
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
19
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
20
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या मेसेजने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली’ अजितदादांच्या रणनीतीचे ‘सिक्रेट’ उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:20 IST

-  त्या एस एम एसने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली,अशी त्यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी याबाबत सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चर्चेेत आली आहे.  

बारामती - माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २० जागांवर एकहाती वर्चस्व मिळवत  जिंकली. यामध्ये विरोधकांना केवळ एका जागेवर समाधान मानावं लागले.मात्र,यंदा पवार उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वत: उमेदवार जाहिर करुन थांबले नाहित.तर स्वत:चेच नाव कारखान्याचे अध्यक्षपदासाठी घोषित केले.त्यामुळे बारामतीकरांच्या भुवया उंचावल्या होत्या.तसेच पवार यांच्या रणनीतीचा ‘सस्पेन्स’ कायम होता.आता मात्र, पवार यांचे यांचे ‘सिक्रेट’ समोर आले आहे. त्या एस एम एसने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली,अशी त्यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी याबाबत सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चर्चेेत आली आहे.

बारामतीच्या राजकारणात पवार यांनी विधानसभा निवडणुकीशिवाय इतर निवडणुकीत  स्वत:ची उमेदवारी जाहिर करण्याची पहिलीच वेळ  आहे.त्यामुळे पवार यांच्या रणनीतीचा ‘सस्पेन्स’ कायम होता.आता याबाबत माहिती पुढे आले आहे.मुसळे म्हणतात, कारखाना निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूक्ष्म नियोजन आणि नेटके व्यवस्थापन या निवडणुकीत दिसून आले. निवडणुकीत अनेकदा जनता काय म्हणते तो आवाज ऐकण्याची गरज असते. निवडणुकीच्या सुरुवातीला एका सामान्य कार्यकर्त्यांने दादांना 'दादा चेअरमनपदाचा उमेदवार जाहीर करू नका. नाहीतर तुम्हीच चेअरमन व्हा.'एका एक मनस्वी मेसेज पाठवला होता. त्यात दादांच्याबद्दलचे भाबडे आणि खरे प्रेम होते. त्या एस एम एसने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली. निवडणूक चर्चेत आली कारण दादांनी स्वतःला चेअरमनपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले.  दादा स्वतः चेअरमन होणार यामुळे कार्यकर्ते ताकदीने लढले.दादांची घोषणा ही एक अस्मिता बनली. 

साखर कारखाना क्षेत्रातला त्यांचा अनुभव हा माळेगाव कारखान्याला अजून उर्जित अवस्था आणेल असा विश्वास यामुळे निर्माण झाला.सभासदांना दादांचे नेतृत्व आश्वासक वाटले, कार्यकर्त्यांच्यात उत्साह निर्माण झाला.कारखान्याच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक सकारात्मक गोष्टी त्यांनी मांडल्या, त्या सभासद शेतकऱ्यांना भावल्या. स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा कारखान्याचे चेअरमन होणार ही गोष्ट लोकांना भावली. मुळात ही घोषणा लोकांना अनपेक्षित होती, त्यामुळे दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सभासदांनी अभूतपूर्व यश दिले. निर्णायक कौल दिल्याचे मुसळे यांनी पोस्ट मध्ये नमुद केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारResult Dayपरिणाम दिवस