ओतूर ( पुणे जि.) - जुन्नर–ओतूर मार्गावरील पांगरीमाथा परिसरात आज दुपारी २:३० सुमारास झालेल्या भीषण अपघातात निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय ५२) यांचा मृत्यू झाला. ट्रक आणि कार यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला असून, एक जण गंभीर जखमी आहे.प्राथमिक माहितीनुसार, जुन्नरहून ओतूरकडे येणारा हायवा ट्रक (क्र. MH 14 KQ 0812) आणि ओतूरहून जुन्नरकडे निघालेली होंडा सिटी (क्र. MH 12 FF 6423) पांगरीमाथा येथे एकमेकांना जोरात धडकले. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात अनंता गवारी, विजय खारतोडे (वय ४८) आणि तुषार भीमराव कोरडे (वय ३५, सर्व रा. जुन्नर) जखमी झाले. गवारी यांना पुण्याकडे उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. विजय खारतोडे यांची प्रकृती गंभीर असून, तुषार कोरडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना बाहेर काढले आणि ओतूर येथील निरामय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याकडे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती; मात्र, पोलिसांनी तत्काळ नियंत्रण मिळवत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, संबंधित डंपर हा मांदारणे येथील ‘विघ्नहर्ता खडी केशर अँड पेवर्स’ कंपनीचा असल्याची माहिती समोर आली असून, ओतूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
Web Summary : A truck and car collided head-on near Pangrimaatha on Junnar-Otur Road, injuring three. A government official and another are in serious condition. The injured were rushed to the hospital in Otur, and further investigation is underway.
Web Summary : जुन्नर-ओतूर मार्ग पर पांगरीमाथा के पास ट्रक और कार की आमने-सामने टक्कर में तीन लोग घायल हो गए। एक सरकारी अधिकारी और एक अन्य गंभीर हालत में हैं। घायलों को ओतूर के अस्पताल में भर्ती कराया गया, आगे की जांच जारी है।