शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : शेती महामंडळाचे कामगार टाकणार मतदानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 13:44 IST

घरांच्या दुरवस्थेमुळे घेतला निर्णय...

ठळक मुद्दे मंजूर झालेली घरकुले झाली गायब

बारामती : लालपुरी, ५७ चाळ येथे शेती महामंडळाचे कामगार गेल्या ४ पिढ्यांपासून वास्तव्य करीत आहेत. सध्या या घरांची दुरवस्था झाली आहे़. घराच्या भिंती खचल्या, पत्रे कुजले आहेत. परंतु, स्वत:च्या जागा नसल्यामुळे कामगार पुरते हतबल झाले आहेत़. अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये हे कामगार वास्तव्य करत असून मंजूर झालेले घरकुलेही कोठे आहे, हे देखील न उलगडलेले कोडे बनले आहे़.‘आम्हाला जागेसहित घर देण्यात यावे; अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची’ भूमिका कामागरांनी घेतल्याचे समजते़.  १९६३ मध्ये महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांत शेती महामंडळाची स्थापना करण्यात आली. या शेतीवर दलित मागासलेले हजारो कामगार गेल्या ४ पिढ्यांपासून राबराब राबले आहेत. भाडेतत्त्वावर या कामगारांना घरे शेती महामंडळाने दिली आहेत. लालपुरी, धवलपुरी, रत्नपुरी, ५७ चाळ या भागातील शेकडो घरांची पडझड झाली आहे. काही वर्षांपूर्वी या भागातील खासदार नुकसानग्रस्त कामगारांना भेटी देऊन मंत्रालयासमोर उपोषण करून न्याय देण्याचे आश्वासन रत्नपुरी मुख्य कार्यालयासमोर कामगारांना दिले होते. त्यानंतर शासनाने घरकुले दिली़ मात्र, त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही़.  सध्या निवडणूकीचे वातावरण असून कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी मते मागावयास गेले असता तेथील कामगार आम्हाला आमची घरकुले द्या, अशी मागणी करत आहे़. दोन गुंठे जागा व राहते घर करून देत नाहीत. तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाºयांना मतदान करणार नसल्याचे येथील घरकुल मंजूर होऊन न मिळालेले कामगार राही मसा बाबर, वसंत नामदेव भोसले, दशरथ विठोबा चव्हाण, शंकर दशरथ चव्हाण, भगवान ज्ञानदेव चव्हाण, आभिमान शिंदे, सुखदेव पांडुरंग चव्हाण यांनी केला आहे़. .......

टॅग्स :PuneपुणेVotingमतदानElectionनिवडणूकagricultureशेती