शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

पंतप्रधान आवास योजनेची सोडत अचानक रद्द; पिंपरीत सत्ताधारी भाजपा 'आक्रमक'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 6:37 PM

आयुक्त, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी व ठिय्या आंदोलन

पिंपरी:  पंतप्रधान आवास योजनेची सोडत प्रशासनाने अचानक रद्द केल्याने महापौर उषा ढोरे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला. दरम्यान, आयुक्त, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपने घोषणाबाजी केली. 

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी दुपारी तीन वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढली जाणार होती. त्यासाठी दुपारपासून नागरिक जमा झाले होते. महापौर उषा ढोरे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. अचानक सोडत रद्द करण्यात आली. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.

राष्ट्रवादीपुढे झुकणाऱ्या आयुक्तांचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा दिल्या. महापौरांचा अपमान झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. कोणाच्या सांगण्यावरून कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. 

...........आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले..आवास योजनेसाठी केंद्र, राज्य सरकार यांचा निधी आहे त्यामळे याबाबत राजशिष्टाचाराचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत माझ्याकडे कार्यक्रम फाईल आल्यानंतर राजशिष्टाचार पालन न  झाल्याचे लक्षात आले. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत सोडत व्हावी यासाठी आम्ही आग्रही होतो.  राजशिष्टाचाराचे पालन झाले नाही. त्यामुळे सोडत रद्द केली आहे."

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणshravan hardikarश्रावण हर्डिकर