ओव्हरटेकिंगच्या नादात ताबा सुटला; अहिल्यानगर-कल्याण महामार्गांवरील एसटी अपघात, मृत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:43 IST2026-05-18T13:42:52+5:302026-05-18T13:43:31+5:30

पाऊस सुरू असतानाही इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात आणि चालकाच्या बेदरकारपणामुळेच हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाले आहे

Lost control while overtaking; ST accident on Ahilyanagar-Kalyan highway, case registered against deceased driver | ओव्हरटेकिंगच्या नादात ताबा सुटला; अहिल्यानगर-कल्याण महामार्गांवरील एसटी अपघात, मृत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

ओव्हरटेकिंगच्या नादात ताबा सुटला; अहिल्यानगर-कल्याण महामार्गांवरील एसटी अपघात, मृत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वडगाव आनंद : नगर-कल्याण महामार्गावर गुंजाळवाडी येथे रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण एसटी बस अपघातात नवा खुलासा झाला आहे. पाऊस सुरू असतानाही इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात आणि चालकाच्या बेदरकारपणामुळेच हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी मयत बस चालक मोहम्मद सलीम मोहम्मद इसुफ याच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.  

अहिल्यानगरहून भिवंडीकडे निघालेली एसटी बस (एम एच १४ बीटी ४०२३) गुंजाळवाडी गावच्या हद्दीत आली असता हा अपघात घडला होता. या अपघातात चालक मोहम्मद सलीम (वय ४०, रा. अमरावती) आणि प्रशांत साईनाथ होनशेटे (वय २७, रा. नांदेड) या दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमी प्रवासी नितीन सिद्धार्थ काळे (वय ३७, रा. बदलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, परिसरात झिमझिम पाऊस पडत असतानाही बस चालक गाडी भरधाव वेगात चालवून इतर वाहनांना ओव्हरटेक करत होता. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि अंदाजे ३० प्रवाशांनी भरलेली बस थेट रस्त्याशेजारील खड्ड्यात पलटी झाली. फिर्यादीवरून पोलिसांनी मृत चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटरवाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.  
अपघातातील जखमींवर आळेफाटा येथील माऊली, कोकणे, शिवम आणि युनिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे पुढील तपास करत आहेत.

Web Title : नगर-कल्याण राजमार्ग पर एसटी बस दुर्घटना: चालक की लापरवाही संदिग्ध।

Web Summary : नगर-कल्याण राजमार्ग पर एक घातक एसटी बस दुर्घटना, बारिश में लापरवाही से ओवरटेकिंग के कारण हुई, जिसमें दो लोगों की मौत हो गई। बस के खाई में पलटने और कई यात्रियों के घायल होने के बाद मृतक चालक के खिलाफ लापरवाही से गाड़ी चलाने का मामला दर्ज किया गया है। पुलिस जांच जारी है।

Web Title : ST Bus Accident on Nagar-Kalyan Highway: Driver's Negligence Suspected.

Web Summary : A fatal ST bus accident on the Nagar-Kalyan highway, caused by reckless overtaking in rainy conditions, resulted in two deaths. The deceased driver is now booked for negligent driving after the bus overturned into a ditch, injuring many passengers. Police investigation is ongoing.