शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

नाझरे जलाशय परिसर झाला चकाचक

By admin | Updated: October 3, 2015 01:32 IST

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जेजुरी जयाद्री मित्रपरिवार, मल्हार निसर्गसंवर्धन संघटना, जेजुरी नगरपालिका व द सावली फाउंडेशन यांच्या वतीने नाझरे

जेजुरी : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जेजुरी जयाद्री मित्रपरिवार, मल्हार निसर्गसंवर्धन संघटना, जेजुरी नगरपालिका व द सावली फाउंडेशन यांच्या वतीने नाझरे धरण कॉलनी परिसरातील जलाशयाचा किनारा स्वच्छ करण्याचे अभियान राबविण्यात आले.पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे कऱ्हा नदी वाहू लागली, मल्हारसागर (नाझरे धरण) जलाशयात सुमारे पन्नास टक्के पाणीसाठा झाला. श्री गणेश विसर्जनावेळी जेजुरी शहरातील होळकर तलावात पुरेसे पाणी नसल्याने जेजुरीकरांनी तसेच अनेक सार्वजनिक मंडळांनी नाझरे धरणात श्री गणेशाचे विसर्जन केले. या वेळी मोठ्या प्रमाणात निर्माल्यही पाण्यात टाकण्यात आले होते. तसेच या परिसरात रोज देवकार्यही होत असल्याने हार, फुले नैवेद्य, प्लॅस्टिक कागद, देवांचे फोटो, कपडे आदींचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कॉलनी परिसरातील कऱ्हा नदीच्या काठावर सर्वत्र कचऱ्याचे प्रमाण वाढून पाणी दूषित होऊ लागले होते. या अभियानात जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई, नगरसेविका साधना दीडभाई, जयाद्री व मल्हार निसर्गसंवर्धन संस्थेचे कुमार पवार, गणेश टाक, विजयकुमार हरिचंद्रे, राहुल मंघनानी, आयुब खान, तनाज पानसरे, प्रशांत नाझीरकर, अतुल आगलावे, विलास कड नितीन राऊत, भाऊसाहेब देशमुख, विशाल बारभाई, आशा बारभाई, संगीता राऊत, सचिन झगडे, वासंती पवार, तसेच द सावली फाउंडेशनचे सायली धनाबाई, उमेश कुदळे, डॉ. तृप्ती भोईटे, प्रमोद शेंडकर, श्रीकृष्ण ढोले; तसेच नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई यांनी आभार मानले. कऱ्हा नदीवर दरवर्षी जयाद्री परिवारच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येतो. (वार्ताहर)