शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 18:41 IST

बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करुन, नरडीचा घोट घेतो, अशा प्रसंगी शेतात राबताना हा बिबट्याने आपली शिकार करु नये म्हणून ग्रामस्थांनी नवी शक्कल लढवली

पुणे : उत्तर पुणे जिल्हा म्हणजे जुन्नर, आंबेगाव, शिरूर खेड या भागात बिबट्याची प्रचंड दहशत सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे. हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला आहे. सध्या शेतीच्या कामाला वेग आला आहे. परंतु रात्रंदिवस या संपूर्ण परिसरात बिबट कधी कुठे निदर्शनास येईल याचा नेम नाही. त्यामुळे त्या तालुक्यांच्या गाव वाडीवस्त्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली जगत आहे. अशातच स्वरक्षणासाठी महिलांवर गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ आली आहे. शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड भागातील महिलांनी ही नवी शक्कल लढवली आहे. 

पुणे जिल्ह्याच्या या तालुक्यांमध्ये बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या बिबट्यापासून स्वतःच स्वरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ वाटेल त्या उपाययोजना करत आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावच्या महिलांनी तर थेट गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टाचं घातला आहे. बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करुन, नरडीचा घोट घेतोय. अशा प्रसंगी शेतात राबताना बिबट्याने आपली शिकार करु नये, म्हणून महिलांनी टोकदार खिळे असलेला पट्टा थेट गळ्यात घातला आहे. शेत हेचं उपजीविकेचं साधन असल्यानं, शेतात जाण्याविना या शेतकऱ्यांसमोर पर्याय नसतो. पण त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यातून जीव कसा वाचवायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. त्यावर पर्याय म्हणून जसं कुत्र्यांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे घातले जातात, तसे पट्टे घालण्याचा निर्णय या बळीराजाने घेतलाय. सरकार आणि वनविभाग ग्रामस्थांना संरक्षण देण्यात अपयशी ठरतंय, त्यामुळं बळीराजावर टोकदार खिळ्यांचे पट्टे परिधान करण्याची वेळ आलीये. जे खरंच लाजिरवाणे आहे.

मागील दोन वर्षापासून आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचे हल्ले होऊन शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कुत्रे असे पाळीव प्राणी त्याचे भक्षक झाले आहेत. त्याचप्रमाणे माणसे, महिलांवर हल्ले करून त्यांनाही ठार केले आहे. आता तर बिबट्या लहान मुलांनाही लक्ष्य करू लागले आहेत. पिंपरखेडच्या रोहन बोंबे या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक होऊन रास्ता रोको आंदोलन केले. अखेर वनविभागाने त्या बिबट्याला ठार केले. सर्व ठिकाणी  ग्रामस्थ वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करत आहेत. वन विभागाकडून पिंजरेही लावले जातात परंतु त्यामध्ये भक्षाचा अभाव तसेच बिबट्या पिंजऱ्यामध्ये न येणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. म्हणून बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. सध्या तरी पाळीव प्राणी यांच्यावर होत असलेले हल्ले वाढलेले आहेत. मनुष्यहानी होऊ नये म्हणून वन विभागाने त्वरित काळजी घेऊन बिबट्यासाठी पिंजरा लावावा ही अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard terror in Pune: Villagers wear spiked collars for protection.

Web Summary : Villagers in Pune district, terrorized by frequent leopard attacks, are resorting to wearing spiked collars around their necks for protection while working in fields. With livestock and even humans falling prey, residents feel abandoned by authorities, leading to desperate self-defense measures.
टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभागKhedखेडambegaonआंबेगावShirurशिरुरNatureनिसर्गFarmerशेतकरीWomenमहिला