शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बारामती एमआयडीसी परिसरात बिबट्याचा वावर, दहशतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 18:55 IST

बिबट्याचा जिल्ह्यातील वाढता वावर धडकी भरवणारा 

ठळक मुद्देकटफळ, सावळ, वंजारवाडी, गाडीखेल, गोजुबावी, जैनकवाडी आदी गावांमध्ये दहशतीचे वातावरण

बारामती : बारामती कटफळ परिसरातील एमआयडीसीतील बाऊली इंडिया बेक्स अँड स्वीटस प्रा.ली. कंपनीच्या  आवारात  सोमवारी (ता. ९) रात्री  पहाटे बिबट्याचा वावर कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये आढळला. केवळ सीसीटीव्ही मुळे बिबट्याचा वावर उघड झाला आहे. परिसरात दहशतीचे वातावरण आहे.  आज बाऊली कंपनीजवळ कटफळ रेल्वे स्टेशनसमोर कंंपनीत वाघ आल्याबाबत शहर पोलीस ठाण्याचे दुरध्वनी खणाणले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी,वनविभाग अधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कंपनीच्या आवारात बिबट्याचा वावर आढळला. पहाटे पाच वाजता वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी कंपनीचा संपर्ण परिसर पिंजुन काढला. मात्र, काहीही आढळून आले नाही. तर अधिकारी कर्मचारीही भीतीने आपल्या केबिनमध्येच बसून राहिले. दरम्यान, पाच वाजता वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी कंपनीचा संपूर्ण परिसरात शोध घेतला.मात्र काहीही आढळून आले नाही. बिबट्याने ठिकाण बदलले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. बिबट्या आढळल्याने कटफळ, सावळ, वंजारवाडी, गाडीखेल, गोजुबावी, जैनकवाडी आदी गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने संबंधित भागातील ग्रामस्थांनी समूहाने राहत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.पर्यावरण तज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी ' लोकमत 'शी बोलताना सांगितले की,  सध्या बिबट्याच्या पिढ्या ऊसाच्या क्षेत्रामध्येच जन्मल्या आहेत. त्यामुळे त्यांचा ऊसाचे क्षेत्र त्यांचा नैसर्गिक अधिवास झाला आहे. बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर आदी भाग गवताळ व खुरट्या काटेरी वनस्पतींनी व्यापलेला आहे. मात्र ,बिबट्या शिकारीसाठी या भागात फिरू शकतो.  तो गवताळ व खुरट्या वनस्पती असलेल्या भागाला आपला अधिवास कधीही बनवणार नाही. त्यामुळे बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतात वावरताना काळजी घ्यावी. हातात घुंगराची काठी ठेवावी. चार-पाच जणांच्या घोळक्याने शेतात वावरावे. वनविभागाने देखील या पार्श्वभूमीवर बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड आदी तालुक्यांमध्ये गावा-गावात मोहिम राबवून बिबट्याच्या सवयी आणि त्याच्यापासून बचावाचे उपाय याबाबत माहिती द्यावी, बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा,  असे आवाहन देखील शेतकऱ्यांना करण्यात यावे, असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.एमआयडीसीमधील बाऊली कंपनीच्या आवारामध्ये बिबट्या दिसून आलेला आहे. हा बिबट्या आजूबाजूच्या परिसरात फिरत आहे. ग्रामस्थांनी यासंबंधी आवश्यक ती दक्षता घ्यावी. बिबट्याची काही हालचाल, माहिती मिळाल्यास तात्काळ बारामती तालुका पोलिस ठाण्याशी ०२११२-२४३४३३ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी केले आहे.

टॅग्स :Baramatiबारामतीleopardबिबट्या