शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू

By किरण शिंदे | Updated: December 15, 2025 21:10 IST

महिलेच्या पतीचा १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता

किरण शिंदे: पुण्यातील नवले पुलानंतर कात्रज, कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा ठरतोय. सोमवारी या परिसरात झालेल्या एका अपघातात शिक्षिकेला प्राण गमवावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी वाहतूक वळवताना नियोजनाचा अभाव दिसून आला. त्यातून निर्माण झालेल्या कोंडीत अडकून अपघातग्रस्त शिक्षिकेला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. इस्कॉन चौकाच्या पुढे हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली. रमा कापडी (वय ५३, रा. कात्रज, कोंढवा रोड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. नेहमीप्रमाणे त्या दुचाकीवरून जात असताना, रस्ता वळवण्यात आल्याची कल्पना न आल्याने त्या घाईत उलट्या दिशेने गेल्या. याच वेळी त्या एका भरधाव कंटेनरच्या चाकाखाली सापडल्या. अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

दरम्यान, घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी रमा कापडी यांना रिक्षातून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आली होती. त्यात नियोजनाचा अभाव असल्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. याच कोंडीमुळे रमा कापडी यांना वेळेवर रुग्णालयात दाखल करता आले नाही आणि उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला.

रमा कापडी या जे.एस.पी.एम. संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्या आपल्या मुलीसोबत राहत होत्या. आईच्या अपघाती निधनानंतर आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, कात्रज कोंढवा रस्त्यावरील मुख्य चौकात सलग पाच दिवस कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात सतत वाहतूक कोंडी होत होती. “रस्ता वळवण्यात आला, पण योग्य सूचना नव्हत्या. याला जबाबदार कोण?” असा थेट सवाल शिवसेना नेते वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Teacher Dies Due to Traffic Diversion Chaos, Lack of Planning

Web Summary : A teacher died in Pune due to traffic chaos caused by diversions for a CM's event. Lack of planning led to delays in medical assistance after an accident. Locals are outraged; police are investigating.
टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेTrafficवाहतूक कोंडी