शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खरीप वाया; रब्बीसाठी प्रयत्न

By admin | Updated: September 29, 2015 02:18 IST

बारामती तालुक्यातील जिरायती भागात मागील आठवड्यातील पावसानंतर रब्बीच्या पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, बऱ्याच भागातील

लोणी भापकर : बारामती तालुक्यातील जिरायती भागात मागील आठवड्यातील पावसानंतर रब्बीच्या पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, बऱ्याच भागातील पाणीसाठे अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यातच खरीप वाया गेल्यानंतर रब्बीच्या पेरणीसाठी बी-बियाणे, खते मशागतीसाठी खर्चाची जुळवाजुळव करताना शेतकरीवर्गाला आर्थिक चणचण भासत आहे. या भागातील एकमेव नगदी पीक असलेला कांदा बी व रोपांचे भाव दुप्पट वाढूनही येथील शेतकरी कांद्याची लागवड किंवा पेरणी मोठ्या प्रमाणात करीत आहे. तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील लोणी भापकर परिसरात यंदाचा संपूर्ण खरीप वाया गेल्यानंतर मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला. या भागातील खोलीकरण झालेल्या ओढ्या-नाल्यात पाणी साठले आहे. मात्र, शेजारच्या पळशी, तरडोली, बाबुर्डी, माळवाडी परिसरातील ओढे, पाझर तलाव अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे काही भागात विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झालेली असली, तरी इतरत्र रब्बी हंगामासाठी मोठ्या पावसाची गरज आहे, असे शेतकरीवर्गातून सांगण्यात येत आहे. दरम्यान, मोरगाव ते कऱ्हा वागज या बारामती-पुणे मार्गालगतच्या काळ्यापट्ट्यात रब्बी ज्वारीच्या पेरण्यांना वेग आला आहे. उगवणीनंतर एक मोठा पाऊस झाला, तरी या पट्ट्यातील मालदांडी ज्वारीचे पीक हमखास पदरात पडेल, असे येथील शेतकरी त्रिंबकराव भापकर यांनी सांगितले. या भागात खरीप हंगामात कांद्यासारखे नगदी पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. मात्र, मागील तीन वर्षांपासून पावसाअभावी या भागात कांद्याचे पीक घेता आलेले नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांकडे बी अथवा कांदारोपे नाहीत. तरीही ज्या भागात पाणीपातळीत वाढ झालेली आहे. तेथे कांद्याची पेरणी जोरात सुरू आहे. मात्र, दोन ते अडीच हजार रुपये किलो दराने कांदा बी, तसेच खतांच्या किमतीत अडीचपट वाढ झाली आहे. तर, कांदा लागणीसाठी अडीचशे ते तीनशे रुपये मजुरी द्यावी लागत असल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. पेरणीसाठी खर्चाची जुळवाजुळव करताना ओढाताण होत असल्याचे चित्र आहे.