शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अपंग प्रवाशाचा अपमान

By admin | Updated: April 20, 2017 06:48 IST

एकीकडे पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे पीएमपीएमएलच्या कारभारात शिस्त आणत असले तरी दुसरीकडे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा कमी होताना

पिंपरी : एकीकडे पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे पीएमपीएमएलच्या कारभारात शिस्त आणत असले तरी दुसरीकडे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा कमी होताना दिसत नाही. पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशाला पीएमपीएमएलच्या वाहतूक नियंत्रकाने अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबाबत प्रवाशाने तक्रार देऊनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. भोसरी येथे राहणारे संजय ब्राह्मणकर यांना या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले. या प्रकाराबाबत त्यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना निवेदन दिले आहे. संजय हे अपंग आहेत. ३० मार्चला रात्री पावणेनऊच्या सुमारास भोसरीला येण्यासाठी पीएमपीएमएलच्या महापालिका बसस्थानकात गेले होते. बसस्थानकात जाताच भोसरीकडे निघालेली बस त्यांना दिसली. त्यांनी त्वरित चालकाला हात दाखवून बस थांबविण्याची विनंती केली. मात्र, चालकाने बस न थांबविता पुढे नेली. त्यामुळे संजय यांनी स्थानकातील वाहतूक नियंत्रक कार्यालयात जाऊन बसचालकाबाबत तक्रार केली. मात्र, तेथील वाहतूक नियंत्रकाने आमच्याकडे चालक, वाहकाची नोंद नसल्याचे सांगितले. तसेच वरिष्ठ कर्मचाऱ्यांची नावे आम्ही ठेवत नाही, असे उद्धट उत्तर दिले. त्यावर संजय यांनी तुमच्याकडे नावे पाहिजे, असे सांगितले. त्यावर वाहतूक नियंत्रकाने संजय यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या व्यंगावर अपशब्द वापरले. तसेच सुरक्षारक्षकाला आवाज देऊन याला केबीनमधून हाकलून दे, असे सांगितले. याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, संबंधितावर कारवाई करावी, अशी अपेक्षा ब्राह्मणकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)