शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीचे ‘ते’ नगरसेवक ठरविणार अपात्र

By admin | Updated: February 3, 2015 23:57 IST

अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर नगरसेवक राहुल चितळकर आणि प्रशांत कुऱ्हाडे यांनी चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला.

पुणे: अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर नगरसेवक राहुल चितळकर आणि प्रशांत कुऱ्हाडे यांनी चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. यामुळे नगरपरिषद अधिनयम १९६५ च्या कलम ४४ नुसार दोन्ही नगरसेवकांना अपत्र ठरविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले. दरम्यान, आळंदी परिसरात अन्य लोकप्रतिनिधींनी केलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्याचे आदेश पाटील यांनी दिले आहेत.वेळेवर कामे होत नसल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर व नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर चाकूने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला़ याप्रकरणी पोलिसांनी राहुल चितळकर, प्रशांत कुऱ्हाडे व अन्य चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, ते पळून गेले आहेत़ माझ्यावर सोपविलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडताना व उच्च न्यायालयाने वेळोवेळी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांबाबत दिलेल्या आदेशाचे पालन करताना शासकीय कामात अडथळा आणून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. नागरी अधिनियम १९६५ चे कलम ४२ अन्वये त्या दोघांचे सदस्यपद रद्द करावे अशी मागणी औंधकर यांनी नगरविकास मंत्रालयाला निवेदन देऊन केली होती.औंधकर यांनी तीर्थक्षेत्र आराखड्यानुसार बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाच्या शेजारील अनधिकृत मंदिराचे बांधकाम थांबविण्यास सांगितले होते़ तेथे गेलेले आरोग्य कर्मचारी रमेश थोरात यांना चितळकर यांनी शिवीगाळ केली होती़ याचाच राग मनात धरून चितळकर आणि कुऱ्हाडे यांनी औंधकर यांच्यावर खुनीहल्ला केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पाटील यांनी दोन्ही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची कारवाई सुरू केली आहे. याबाबत दोषी नगरसेवकांना नोटिसा देण्यात आल्या असून, लवकर अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसचे लोकप्रतिनिधी नात्याने चितळकर आणि कुऱ्हाडे बेजबाबदार पद्धतीने वागले असून, औंधकर यांच्यावर हल्ला करण्याचे अत्यंत गैरकृत्य केले आहे. त्यामुळे याबाबत पुढील काही वर्षे निवडणूक लढविण्यास व कडक कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. (प्रतिनिधी)४आळंदीचे मुख्याधिकारी औैंधकर यांनी पुरवणी जबाब दिला असून, माझ्यावरील हल्ला हा संघटितपणे केलेला कट आहे. त्यामुळे राहुल चितळकर, प्रशांत कुऱ्हाडे आणि ड्रायव्हरसह त्यांचे ४ साथीदार यांना दिनांक २९ जानेवारीपासून त्यांच्या मोबाईलवर आलेले सर्व कॉल्स डिटेल्स तपासण्यात यावेत. म्हणजे यात आणखी कोणाचा समावेश असू शकतो हे स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. आळंदीचे मुख्याधिकाऱ्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर आरोपी हे फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत़ लवकरच त्यांना पोलीस अटक करतील़- मनोजकुमार लोहियाअधीक्षक, पुणे ग्रामीण ४दरम्यान, आळंदी नगरपालिकेच्या क्षेत्रात अन्य अनेक लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन पाटील यांनी आळंदी परिसरातील सर्व प्रामुख्याने लोकप्रतिनिधींनी केलेल्या अतिक्रमणांची चौकशी करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.