शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायापासून ते संशोधनापर्यंत उमटवला ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:11 IST

स्वप्नांच्या मागे लागणे आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणणे यासाठी कष्ट करण्याचे बाळकडू यांना मिळाले, याच अंतःप्रेरणेतून यांनी एमपीएम आणि ...

स्वप्नांच्या मागे लागणे आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणणे यासाठी कष्ट करण्याचे बाळकडू यांना मिळाले, याच अंतःप्रेरणेतून यांनी एमपीएम आणि पीएच.डी. या पदव्या संपादन केल्या. स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे घेण्याची मानसिकता, वेगळ्या वाटेवरून चालण्याची विलक्षण क्षमता, सचोटी, नावीन्याची आस आणि स्वयंशिस्त अशा उत्तमोत्तम गुणांचा मिलाफ असल्याने सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सचिवपदी त्या सक्षमपणे कार्यरत आहेत.

संस्थेमध्ये यांच्या मार्गदर्शनानुसार 'सिंहगड करंडक', 'निऑन स्पेक्ट्रम' व विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा यांचे प्रतिसाल आयोजन केले जाते.

पुणे येथे सुरुवात झालेल्या 'सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी' या संस्थेचा बारा शाखांमध्ये विस्तार झाला आहे, ज्या पुण्याबाहेरही कार्यशील आहेत, यात ८५००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात तसेच ८००० हून अधिक कर्मचारी वर्ग आहे. संस्थेच्या संस्थापक सचिव म्हणून संस्थेतील कर्मचारी निवड व भरती, वार्षिक अंदाजपत्रकाचे कामकाज याची जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी, नावीन्यपूर्ण उत्तम बदल आत्मसात करण्यासाठी निरनिराळे संशोधन व शैक्षणिक उपक्रम यांना संस्थात्मक अनुदान उपलब्ध करून देण्याविषयी यांचा सक्रिय सहभाग असतो.

त्या गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकार घेत असतात. त्यानुसार 'श्रीमती काशीबाई नवले रुग्णालय येथे विविध रोगांवरील उपचार व दंतोपचार मोफत उपलब्ध करून दिले आहेत. याला जोड म्हणून नियमित रक्तदान शिबिरे व आरोग्यविषयक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.

सध्याच्या महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत येथील वसतिगृहे कोविड सेंटर्स म्हणून उपलब्ध करून दिली. या सेंटरमधील कोरोना योद्धे, डॉक्टर्स, परिचारिका यांचा सदैव अभिमान वाटतो.

___ कोरोना काळ हा अतिशय संवेदनशील होता, रोगाबद्दलची अपुरी माहिती असल्याने सामान्य लोकांमध्ये भीतीचे सावट होते. या आजारात रुग्णांचे विलगीकरण होणे आवश्यक होते. ते लक्षात घेऊन सिंहगड इन्स्टिट्यूट कोरोनाच्या महामारीमध्ये एकूण १० वसतिगृहे दिली होती. रुग्णांचे मानसिक संतुलन टिकून राहण्यासाठी येथील स्वच्छ व सुंदर नैसर्गिक परिसर जणू वरदान ठरला. "A Home away from Home" अशीच भावना रुग्णांमध्ये होती.

एवढंच नव्हे तर श्रीमती काशीबाई नवले रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी एक स्वतंत्र विभाग देण्यात आला होता, येथे ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर या अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध होत्या. अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी येथील डॉक्टर्स, परिचारिका आणि सेवक वर्ग अहोरात्र मेहनत करत होता, याचे फलित म्हणून अनेक रुग्ण यातून बरे झाले.

कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सेवा, त्यांच्या पाल्यांसाठी सोयी सुविधा कर्मचारी निवास उपलब्ध करून दिले आहेत. अतिशय निरोगी आणि प्रेमळ वातावरण ठेवण्यासाठी त्या आग्रही असतात. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता:!' ही उक्ती यांच्यामुळे सार्थ ठरते.

आजच्या महिला दिनानिमित्त त्या सांगतात "स्त्रीने स्वतःतील गुण जाणून कौशल्य आत्मसात करावे, कणखरपणा व प्रेमळपणा यांची योग्य सांगड घालावी. आत्मविश्वासाने ध्येयाकडे वाटचाल करावी. त्यासाठी कष्टांची तमा बाळगू नये. शेवटी इतकेच "उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः!"

-

डॉ. सुनंदा नवले, संस्थापक सचिव, एसटीईएस