शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

“आरोपीला फाशी मिळेपर्यंत तुमच्या सोबत...”; कुटुंबीयांची भेट घेत अमितेश कुमार यांनी दिला धीर

By किरण शिंदे | Updated: May 4, 2026 21:34 IST

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला.

किरण शिंदे, पुणे: नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार व हत्येच्या संतापजनक प्रकरणानंतर  संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली असताना, पुणे पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन वडिलांशी संवाद साधला.  यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत, “आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत मी तुमच्या सोबत राहणार आहे. तुम्हाला कधीही काही सांगायचे असेल, मदत हवी असेल तर मी स्वतः तुमच्या घरी येईन,” असे आश्वासन दिले.

भोर तालुक्यातील नसरापूर येथे १ मे रोजी साडेतीन वर्षीय चिमुरडीवर भिमराव कांबळे (६५) या आरोपीने लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची भावना व्यक्त होत असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शनिवारी (२ मे) नवले पूल परिसरात सुमारे साडेचार तास रास्ता रोको आंदोलन करत निषेध नोंदवला. “आरोपीला तात्काळ फाशी द्या” अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, या प्रकरणाचा जलदगतीने निकाल लागावा यासाठी पोलिस आयुक्तांनी महत्त्वाची घोषणा केली. या खटल्यासाठी लवकरच विशेष सरकारी वकील नियुक्त केला जाणार असून, तपास आणि न्यायप्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. असे अमितेश कुमार यांनी यावेळी मयत चिमुकलीच्या कुटुंबीयांना सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : "I'm with you till the accused is hanged,": CP assures family.

Web Summary : Pune CP Amitesh Kumar assured the victim's family of justice in the Nasrapur rape and murder case. He promised full support until the accused receives the death penalty, vowing to expedite the legal process and appoint a special public prosecutor.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस