शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

Video: मी मोदींना सांगितलं अन् सुनीलला बोलावलं गेलं! अजितदादांनी सांगितला भेटीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 12:43 IST

सुनील आम्हाला म्हणायचा, ‘माझी ‘सीट’ गेली.’ पण मतदानाच्या दिवशी म्हणाला, ‘मी एक लाखाने निवडून येईन!

पिंपरी : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीचा प्रत्येक विजयी उमेदवार मुंबईत प्रत्येक पक्षकार्यालयात भेटीसाठी गेला आहे. त्या दरम्यान मावळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके हेही पक्षकार्यालयात गेले. त्यावेळी अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या शेळके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा किस्सा उपस्थितांना सांगितला.

आमदार शेळके मुंबईत पक्षकार्यालयात गेल्यानंतर त्यांनी अजित पवार यांना वाकून नमस्कार केला. पवार यांनी जवळ घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेसाठी पुण्यात आले असतानाचा किस्सा सांगितला. ‘मोदीसाहेब ज्यावेळी पुण्यातील सभेला आले होते, त्यावेळी सर्व उमेदवारांच्या भेटी घेत होते. मात्र सुनील बाहेरच होता. मी मोदीसाहेबांना सांगितले की, माझा एक आमदार बाहेर आहे. त्यावर मोदीसाहेबांनी सुरक्षारक्षकाला सांगितले की, अजितदादा म्हणतात त्यांना आत घ्या. त्यानंतर याला आत घेतले. मग आत घेऊन त्याची ओळख करून दिली. तोच फोटो त्याने सगळीकडे चालवला. सुनील आम्हाला म्हणायचा, ‘माझी ‘सीट’ गेली.’ पण मतदानाच्या दिवशी म्हणाला, ‘मी एक लाखाने निवडून येईन! अरे... म्हटले काय रे तू!’ हसत-हसत हा किस्सा सांगत असताना पवार यांनी कपाळावर हात मारून घेतला. या घटनेचा व्हिडीओ पवार यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

मावळात एक लाखांच्या लीडने शेळके विजयी 

मावळ विधानसभा मतदार संघात महायुतीतील नाराजांनी उदयास आणलेला मावळ 'पॅटर्न' फेल झाला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके विजयी झाले आहेत.  त्यांना एक लाख ८ हजार ५६५ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पराभूत केले आहे. मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि महायुतीतील नाराजांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारात झालेल्या लढतीमुळे मावळकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. या मतदार संघात ३२,३५८ म्हणजेच १.४३ टक्के मतदान वाढले आहे. या वाढीव मतदानाने मावळ  'पॅटर्न'ला धक्का दिला आहे

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीmaval-acमावळmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४