शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 1:32 PM

समितीतील भाजपचे संख्याबळ लक्षात घेता, रासने यांची निवड अपेक्षितच

ठळक मुद्देमहापालिकेच्या जुन्या सभागृहात या अध्यक्ष पदाची निवडणूक पडली पार

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी नगरसेवक हेमंत रासने यांची शुक्रवारी निवड झाली. समितीतील भाजपचे संख्याबळ लक्षात घेता, रासने यांची निवड अपेक्षितच होती. आज निवडणूक प्रक्रियेअंती ही औपचारिकता पार पडली.महापालिकेच्या जुन्या सभागृहात या अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 'पीएमपीएमएल'च्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी काम पाहिले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धिरज घाटे, आमदार सुनील कांबळे, काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसचिव सुनील पारखी यावेळी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्रारंभी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर उभे राहून, हात वर करून, प्रभागाचे नाव सांगून सदस्यांचे मतदान घेण्यात आले. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस - शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक कांबळे यांना मतदान करण्यासाठी नाव पुकारण्यात आले. महेंद्र पठारे, अशोक कांबळे, वैशाली मराठे, विशाल धनवडे, स्मिता कोंढरे या 6 सदस्यांनी मतदान झाले. नंतर हेमंत रासने यांना मतदान करण्यासाठी नाव पुकारण्यात आले. दीपक पोटे, दिलीप वेडे पाटील, उमेश गायकवाड, हेमंत रासने, राजेंद्र शिळीमकर, रंजना टिळेकर, हिमाली कांबळे, सुनील कांबळे, प्रकाश ढोरे व योगेश मुळीक या 10 सदस्यांनी मतदान केले. दोन्ही मतदान अंती 10 विरुद्ध 6 या फरकाने रासने विजयी झाल्याचे नयना गुंडे यांनी जाहीर केले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस