शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यात पावसाने उडवली दाणादाण, प्रशासन आणि नागरिकांची उडाली धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 18:18 IST

झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला..

पुणे: शहरात रात्रीपासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे येरवडा, विश्रांतवाडी, कल्याणीनगर,विमाननगर,परिसरात प्रशासन, नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाडे पडल्यााच्या घटना घडल्या आहेत. कल्याणीनगर या ठिकाणी दुधाच्या जीपवर तर एअरपोर्ट रोड व हरी गंगा सोसायटी समोर चारचाकी वाहनांवर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. कल्याणीनगर येथील घटनेत जीप चालक जखमी झालेला आहे. घटनाचे पुणे महापालिका अग्निशमन दल व उद्यान विभागाच्या वतीने कोसळलेली झाडे रस्त्यावरून दूर करण्याचे काम सुरू आहे.कल्याणीनगर येथील आगाखान पॅलेस शेजारील रस्त्यावर दुधाचे कॅन घेऊन जाणाऱ्या जीप क्र. (एम एच 12 पी 38 05) मोठे बाभळीचे झाड कोसळल्याची घटना बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मधील चालक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी येरवडा अग्निशामक दलाचे फायरमन रघुनाथ भोईर, उमेश ढगळे, राजू आल्हाट, सोपान पवार हे दाखल झाले असून जीपवर कोसळलेले बाभळीचे झाड आवश्यक यंत्र सामग्री च्या मदतीने हटविण्याचा प्रयत्न  भर पावसात सुरु आहे. गुंजन चौकाजवळ एअरपोर्ट रस्त्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंच समोर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास  एक मोठे झाड एका चार चाकी वर कोसळले. या गाडीत 3 व्यक्ती होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. तर आरटीओ फुलेनगर जवळ हरी गंगा सोसायटी समोर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक मोठे झाड कोसळले. यामुळे अग्रेसन हायस्कूल कडून आरटीओ फुलेनगर कडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता.सुमारे तासाभरानंतर महापालिका उद्यान विभागाच्या जेसीबीने कोसळलेले हे झाड रस्त्यातून दूर केले. येरवडा, विश्रांतवाडी व  परिसरात आज सकाळपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. पुणे महापालिका अग्निशमन दल व उद्यान विभागाच्या वतीने रस्त्यावर उन्मळून  पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम सध्या सुरू आहे.

टॅग्स :YerwadaयेरवडाRainपाऊसAccidentअपघात