पुण्यात डेक्कन जिमखान्यावरील चॅम्पियन स्पोटर्सला भीषण आग

By विवेक भुसे | Published: October 17, 2022 11:40 AM2022-10-17T11:40:26+5:302022-10-17T11:40:39+5:30

आधी पावसात माल भिजला, आता अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडला

Heavy fire breaks out at Champion Sports at Deccan Gymkhana in Pune | पुण्यात डेक्कन जिमखान्यावरील चॅम्पियन स्पोटर्सला भीषण आग

पुण्यात डेक्कन जिमखान्यावरील चॅम्पियन स्पोटर्सला भीषण आग

googlenewsNext

पुणे : डेक्कन जिमखान्यावरील चॅम्पियन स्पोटर्स या दुकानाला सोमवारी सकाळी भीषण आग लागून त्यात दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. बेसमेटमध्ये लागल्याची आग पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर पसरुन तिने रौद रुप धारण केले होते.  दोन दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसाने डेक्कन जिमखान्यावरील फर्ग्युसन रोडवर गुडघाभर पाणी साठून सर्व दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यानंतर आता चॅम्पियन स्पोटर्समधील सर्व साहित्य आगीमध्ये जळून खाक झाले.
 
चॅम्पियन स्पोटर्सच्या सुरक्षा रक्षकाने सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दुकानाचा दरवाजा उघडल्यावर आतून धुराचा लोट आला. ते पाहून त्यांनी अग्नीक्षमन दलाला कळविले. पाठोपाठ अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी पोहचल्या. संपूर्ण दुकानात धूर भरला होता. जवानांनी एक्झॉस्ट ब्लोअरचा वापर करुन काचा फोडून धुराला वाट करुन दिली. तेव्हा बेसमेंटमधून धुर येत असल्याचे आढळून आले. बीए किट घालून दोन जवानांना बेसमेंटमध्ये उतरविण्यात आले. त्यांनी स्प्रेचा मारा करुन आग विझविली. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत दुकानातील बेसमेंटमध्ये ठेवलेले कपडे, बुट, प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. या आगीचा पहिल्या व दुसर्‍या मजल्यावरील साहित्याला मोठ्या प्रमाणावर झळ पोहचली आहे. आता आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे.

Web Title: Heavy fire breaks out at Champion Sports at Deccan Gymkhana in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.