शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मामांचेच आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 18:27 IST

इंदापूरमध्ये २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेले हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता.

ठळक मुद्देकोणताही वेगळा निर्णय न घेता उमेदवारीबाबत अजित पवार यांचा शब्द अंतिम

कळस :  इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे मामा म्हणून ओळखले जातात. त्यांचे आव्हान असतानाच आता हर्षवर्धन पाटील यांना त्यांचे सख्खे मामा आप्पासाहेब जगदाळे यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे. मात्र, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील इंदापुरातील गटबाजी उघड झाली आहे. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न पाटील करत आहेत. इंदापूरमध्ये २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेले हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. पाटील यांचे सख्खे मामा जगदाळे यांनीही भरणे यांच्यासाठी प्रयत्न केले होते. यावेळी विद्यमान आमदार असल्याने भरणे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे पाहून पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर जगदाळे यांनी सराटी येथे मेळावा घेऊन आपली उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. भरणे यांच्या व्यतिरिक्त इच्छुकांना पैकी कोणालाही उमेदवारी  द्यावी.त्याचा  कार्यकर्ते एकदिलाने काम करतील ,असा ठराव  या मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्यास  अशोक घोगरे, गणेश झगडे, भाऊसाहेब सपकळ यांच्यासह छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप,,शशिकांत तरंगे, कांतीलाल जामदार,रामभाऊ पाटील,विठ्ठलराव ननवरे,संजय निंबाळकर आदी उपस्थित होते.  जगदाळे यांनी आव्हान दिले असले तरी कोणताही वेगळा निर्णय न घेता उमेदवारीबाबत अजित पवार यांचाशब्द अंतिम मानला जाईल,असा निर्णय या गटाने जाहीर केला आहे. मात्र, गेल्यावेळी या सगळ्या नेत्यांनी भरणे यांचे काम केल्याने इंदापूर तालुक्यातील जातीय समीकरण बदलले होते. त्याचा फायदा भरणे यांना झाला होता. त्यामध्येच बिघाड करण्याचा पाटील यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्याला या मेळाव्याच्या रुपाने सुरूवात झाली आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक