शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

औंधमधील 'त्या' घटनेतील सराईतासह दोघांना हडपसर पोलिसांनी पाठलाग करून ठोकल्या बेडया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 10:13 PM

चारचाकी, दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा १८ लाख १७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

पुणे : औंध मध्ये दरोडेखोरांना पाहून पोलिस पळून गेल्याची घटना चर्चेचा विषय ठरली. या घटनेमधील सराईतासह दोघांना हडपसर पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे. त्यांच्याकडून चारचाकी, दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा १८ लाख १७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीवर चोरीचे ७० गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.

सनीसिंग पापासिंग दुधाणी (वय २२) आणि सोहेल जावेद शेख (वय २१, दोघेही रा. गोसावी वस्ती, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. संघटित न्हेगारीच्या (मोक्का) गुन्ह्यात फरार असलेल्या सनीसिंगवर सुमारे ७० गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींनी या वर्षांत केलेले तब्बल १२ चोरी आणि घरफोडीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाहन चोरी, जबरी चोरीघरफोडीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने हडपसर पोलिस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सौरभ माने व पोलिस अंमलदार हे मंगळवारी दुपारी गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलिस नाईक आणि पोलिस शिपाई यांना खब-यामार्फत सनीसिंग आणि शेख यांच्याविषयी माहिती मिळाली. ते दोघे त्यांच्या अल्पवयीन साथीदाराबरोबर बिराजदारनगर येथील कॅनॉलजवळ फिरत असल्याचे त्यांना समजले.

दरम्यान, पोलिस संबंधित ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांनाही ते दुचाकीवरून फिरताना आढळून आले. दरम्यान पोलिसांनी सनी सिंगला थांबण्यास सांगूनही तो थांबला नाही. परंतु, यावेळी पळून जाताना दोघांनाही पाठलाग करून पोलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, निरीक्षक राजू अडागळे, दिगंबर शिंदे, सहायक निरीक्षक हनुमत गायकवाड, उपनिरीक्षक सौरभ माने, अंमलदार प्रदिप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, नितीन मुंडे,समीर पांडुळे, अविनाश गोसावी, पोलिस शिपाई अकबर शेख, प्रशांत टोणपे, शाहीद शेख, प्रशांत धुमाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.दरम्यान, अटक आरोपींचा साथीदार अमरसिंग टाक (वय २५) हा अद्याप फरार आहे.

चोरलेल्या दागिन्यांपैकी काही मुद्देमाल टाक यांच्याकडे आहे. त्यांनागुन्हा करण्यास कोणी मदत केली याचा तपास करायचा असल्याने व आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली. न्यायालयाने आरोपींना १७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीThiefचोरArrestअटकPoliceपोलिस