शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नातवासाठी आजोबा मैदानात...! बारामतीत युगेंद्र पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 16:36 IST

नातवाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: उपस्थित राहून शरद पवारांनी बारामती विधानसभा निवडणुक गांभीर्याने घेतल्याचे संकेत दिले

बारामती: बारामती विधानसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी तो स्वीकारला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी युगेंद्र पवार यांच्या कन्हेरी येथील ‘अनंतारा’ निवासस्थानी त्यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर  आई शर्मिला पवार, वडील श्रीनिवास पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी श्री क्षेत्र कण्हेरी येथील मारुतीरायचे दर्शन घेतले. त्यानंतर साडेदहा वाजता  येथील तहसीलदार कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार,सदाशिव सातव,खासदार सुप्रिया सुळे,अॅड.संदीप गुजर,अॅड.एस. एन जगताप उपस`थित होते.  पत्रकारांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, माझी ही पहिलीच निवडणुक आहे.  मात्र, अनेक वर्षांपासून समाजकार्यात कार्यरत आहे. माझ्या पाठीशी साहेबांचा आशिर्वाद असल्याने  ‘काॅन्फीडन्स’ वाटतो. नक्कीच आपण यशस्वी होऊ. २७ व्या वर्षी बारामतीकरांनी साहेबांना निवडुन दिले. त्यांना आशिर्वाद दिले. त्याचप्रमाणे आज इच्छा व्यक्त करतो. बारामतीकरांनी मला निवडुन द्यावे. साहेबांप्रमाणे नक्कीच चांगले काम करुन दाखवेन.

यंदा प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुतण्याच्या विरोधात नातवाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना चक्क तहसिल कार्यालयातील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. नातवाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: उपस्थित राहून शरद पवारांनी बारामती विधानसभा निवडणुक गांभीर्याने घेतल्याचे संकेत दिले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीSharad Pawarशरद पवारyugendra pawarयुगेंद्र पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस