मुलींची सुरक्षा कागदावरच, गुन्ह्यांचे आकडे वाढताहेत; आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 08:30 IST2026-05-04T08:28:31+5:302026-05-04T08:30:11+5:30

पुणे शहरात २०२४ मध्ये ५०५ महिलांवर बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले, तर ८६४ महिलांचा विनयभंग केल्याच्या घटनांची नोंद झाली. २०२५ मध्ये शहरात ४७३ महिलांवर बलात्काराच्या घटना आणि ८३६ महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या आहेत.

Girls' safety is on paper only, crime figures are increasing; Demand for death penalty for the accused | मुलींची सुरक्षा कागदावरच, गुन्ह्यांचे आकडे वाढताहेत; आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

मुलींची सुरक्षा कागदावरच, गुन्ह्यांचे आकडे वाढताहेत; आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पुणेनसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या आणि महाळुंगे येथील चिमुकल्यावरील अत्याचार आणि गळा चिरून केलेल्या हत्येच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. याविरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

पुणे शहरात २०२४ मध्ये ५०५ महिलांवर बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले, तर ८६४ महिलांचा विनयभंग केल्याच्या घटनांची नोंद झाली. २०२५ मध्ये शहरात ४७३ महिलांवर बलात्काराच्या घटना आणि ८३६ महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यभरात केवळ २०२४-२५ मध्येच ९४ हजार महिला बेपत्ता, त्यात हजारो अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचे या आकडेवारीवरून भीषण वास्तव समोर येत आहे. 

पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच

आकडे काय सांगतात?

२०२२ साली राज्यात २ हजार ९०४ बलात्काराचे गुन्हे दाखल

२०२३ मध्ये राज्यात ७ हजार ५२४ बलात्काराचे गुन्हे दाखल

२०२४ मध्ये राज्यात ७ हजार ९४० बलात्काराचे गुन्हे दाखल

विनयभंग प्रकरणांमध्येदेखील १७ हजार ३२८ वरून १७ हजार ६७१ पर्यंत वाढ

२०२४-२५ मध्ये राज्यात ९४ हजार महिला बेपत्ता, हजारो अल्पवयीन मुलींचा समावेश

पुण्यातील महिला अत्याचारांच्या घटना...

स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर दत्तात्रय गाडे नामक आरोपीने बसमध्ये बलात्कार केला. ही घटना फेब्रुवारी २०२५ मध्ये घडली होती.

पुण्यातील मालधक्का चौक परिसरात फुटपाथवर आई-वडिलांसोबत झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून नराधमाने तिला रेल्वेच्या एका बोगीत नेऊन अमानुष मारहाण केली. तिच्या शरीराचे ठिकठिकाणी चावे घेतले. गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत सापडलेल्या या बालिकेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने १५ वर्षांच्या दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

लक्ष्मीनगर भागातील एका सोसायटीत शैलेश कुमार (वय २५) या सुरक्षारक्षकाने एका १५ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. प्रकृती बिघडल्याने या मुलीला ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मार्च २०२६ मध्ये २ घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले आहेत.

Web Title : लड़कियों की सुरक्षा कागजों पर ही; अपराध दरें पुणे में बढ़ रहीं हैं।

Web Summary : महाराष्ट्र में लड़कियों के खिलाफ क्रूर अपराधों से दहशत है। पुणे में बलात्कार और छेड़छाड़ के मामले उच्च हैं। 2024-25 में, राज्य भर में 94,000 महिलाएं लापता हो गईं। पुणे में यौन उत्पीड़न और हत्या की कई घटनाएं दर्ज की गई हैं।

Web Title : Girls' safety on paper only; crime rates rising in Pune.

Web Summary : Maharashtra is shaken by brutal crimes against girls. Rape and molestation cases are high in Pune. In 2024-25, 94,000 women went missing statewide. Several incidents of sexual assault and murder are reported in Pune.