पुणे: सोसायटीच्या आवारात असलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यात पडून बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील मगरपट्टा भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून सोसायटीच्या चेअरमनसह कार्यकारणी सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अनिका नवनाथ देवीकर (वय ४.५ वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत तिचे वडील नवनाथ पांडुरंग देवीकर (वय ३४, रा. वेदविहार सोसायटी, नोबल हाॅस्पिटलजवळ, मगरपट्टा, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अनिका सोसायटीच्या आवारात खेळत होती. सोसायटीकडून आवारात लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली आहे. सोसायटीच्या आवारातील लोखंडी घसरगुंडीमुळे अनिकाच्या डोके, चेहरा, मानेला गंभीर दुखापत झाली. बेशुद्धावस्थेतील अनिकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सोसायटीच्या आवारातील घसरगुंडी व्यवस्थित बसवली नव्हती. ती काढून टाकण्याबाबत अनिकाचे वडील नवनाथ यांनी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. याबाबत वारंवार तक्रार दिली होती. मात्र, सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही न केल्याने दुर्घटना घडल्याचे अनिकाचे वडील नवनाथ देवीकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक साने करत आहेत.
Web Summary : In Pune, a four-year-old girl died after a poorly installed slide fell on her in a society compound. Police have registered a case against the society's chairman and committee members for negligence, as the girl's father had repeatedly complained about the unsafe slide.
Web Summary : पुणे में, एक सोसायटी परिसर में खराब तरीके से स्थापित स्लाइड गिरने से चार साल की बच्ची की मौत हो गई। पुलिस ने सोसायटी के अध्यक्ष और समिति सदस्यों के खिलाफ लापरवाही का मामला दर्ज किया है, क्योंकि बच्ची के पिता ने असुरक्षित स्लाइड के बारे में बार-बार शिकायत की थी।