शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात चौथ्या 'कॉम्बिंग ऑपरेशन' मध्ये गुन्हेगारांची झाडाझडती, ६२ गुन्हेगारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 11:22 IST

पोलिसांकडून ६२ गुन्हेगार अटक, २ पिस्तुल, १४ कोयते, २ तलवारी जप्त

पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी गेल्याकाही महिन्यात चौथ्यांदा कॉम्बिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यात विविध कारणावरुन तब्बल ६२ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. या गुन्हेगारांकडून २ पिस्तुले, १४ कोयते, २ तलवारी जप्त केल्या आहेत. तसेच एका आरोपीकडून २ किलो ७६६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यानकॉम्बिंग ऑपरेशनची कारवाई केली. या दरम्यान, एकूण १३८ गुन्हेगारतपासण्यात आले. त्यापैकी ८० गुन्हेगार मिळाले. प्रतिबंधक कारवाईच्या एकुण ३३ केसेस करुन ३३ गुन्हेगारांना अटक करुन त्यांचेकडुन एकुण १ लाख ८३ हजार ४८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे,पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांनी केली.पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ पिस्तुले व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. तर १४ कोयते, २ तलवारी बाळगणार्‍या १६ जणांना अटक केली आहे. तडीपारीचा आदेश भंग करून शहरात वावरणार्‍या ५ तडीपारांना पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान, राबविलेल्या कॉम्बिंग ऑपरेशमध्ये अमंली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी २ किलो ७६६ ग्रॅम गांजा जप्त केला असून यावेळी एकाला अटक करण्यात आली आहे. तर तंबाखु जन्य पदार्थ विक्री करणार्‍या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून २६ हजार ६६५ चा माल जप्त करण्यात आला आहे. तर अवैधरित्या दारू विक्री करताना सापडल्याने दोघांना अटक करण्यात आली.चतुश्रृंगी, कोथरुड, वानवडी, हडपसर पोलिस ठाण्याच्या गंभीर गुन्हयातील पाहिजे असलेल्या एकुण ५ जणांना ताब्यात घेऊन त्यांना संबंधीत पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.शहरात यापुढेही कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येऊन गुन्हेगारांचेहालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटकcommissionerआयुक्त