काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या कारचा अपघात; पिरंगुटजवळ दुर्घटना, पायाला दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:25 IST2026-05-12T14:24:39+5:302026-05-12T14:25:39+5:30
वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव इलेक्ट्रिक कार थेट टेकडीवर आदळली, या अपघातात अभय छाजेड जखमी झाले

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या कारचा अपघात; पिरंगुटजवळ दुर्घटना, पायाला दुखापत
पुणे : काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या कारला सोमवारी रात्री पिरंगुट परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभय छाजेड हे पिरंगुट येथील त्यांच्या आर्किटेक्चर कॉलेजमधून पुण्याकडे परतत होते. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिरंगुट घाटात झालेल्या अपघातात अभय छाजेड जखमी झाले. घाटात भरधाव इलेक्ट्रिक कार थेट टेकडीवर आदळली. त्यांना रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर छाजेड यांना तातडीने पूना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार सुरू असून त्यांचा एमआरआय स्कॅन करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून ते सर्वांशी संवाद साधत आहेत. या घटनेची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती.