शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

‘क्रॉस व्होटिंग’ची भीती

By admin | Updated: February 17, 2017 05:23 IST

चार सदस्यांचा एक प्रभाग या नव्या प्रभाग रचनेला सर्व राजकीय पक्ष सामोरे गेले असले तरी आता प्रत्यक्ष मतदान जवळ येऊन ठेपल्यानंतर

पुणे : चार सदस्यांचा एक प्रभाग या नव्या प्रभाग रचनेला सर्व राजकीय पक्ष सामोरे गेले असले तरी आता प्रत्यक्ष मतदान जवळ येऊन ठेपल्यानंतर उमेदवारांना मतदार एकाच वेळी चार मते एकाच पक्षाला देईल का, याविषयी शंका वाटते आहे. अशा क्रॉस व्होटिंगच्या शक्यतेने पक्षाकडून पॅनेल निवडून आणण्याची जबाबदारी घेतलेले उमेदवार चिंताक्रांत झाले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक बहुतेक वेळा पक्षावर नाही तर उमेदवाराच्या मतदारांशी असलेल्या वैयक्तिक संपर्कावर होते. तसे होऊ नये, यासाठी भाजपाच्या सरकारने जाणीवपूर्वक चार सदस्यांचा एक प्रभाग अशी नवी रचना केली असल्याची टीका होत होती. लहान पक्षांचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करीत भारिप बहुजन महासंघ व अन्य काही पक्षांनी या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पुढे त्यावर त्यावर फारशी चर्चा न करता सर्व राजकीय पक्षांनी ही नवी रचना स्वीकारली.एरवी एका प्रभागातील मतदार संख्या साधारण ४ ते ५ हजारांपर्यंत असायची. यावेळी मात्र चार सदस्यांचा एक प्रभाग केल्यामुळे प्रभागाचे भौगौलिक क्षेत्र वाढले आहे. मतदारांची संख्याही ६० हजारांपेक्षा जास्त आहे. बहुसंख्य पक्षांनी चारही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. पक्षीय व प्रभाग स्तरावरही सर्वांचा एकत्रित प्रचारही सुरू आहे. मात्र एका प्रभागात एका मतदाराची चारही मते एकाच पक्षाला मिळतील का, याविषयी उमेदवार साशंक असल्याचे दिसते आहे. असे क्रॉस व्होटिंग झाले तर प्रभागामध्ये संपूर्ण पॅनेल निवडून येण्याची शक्यता मावळली असल्याचे काही उमेदवार बोलून दाखवत आहेत. मतदान यंत्रांवरील उमेदवारांच्या नावांच्या रचनेमुळेही ही शंकेत तथ्य असल्याचे दिसते आहे. चारही प्रभागांना अनुक्रमे अ, ब, क, ड अशी नावे आहेत. त्यांना पांढरा, फिका गुलाबी, फिका पिवळा, फिका निळा असे रंग आहेत. वरच्या बाजूस अ गट व त्याखाली त्या गटातील उमेदवारांची अल्फा बेटीकली नावे व त्यासमोर त्यांचे चिन्ह असेल. अखेरची ओळ नोटा (यापैकी एकही पसंत नाही) ती संपल्यानंतर त्याच मतदान यंत्रावर एक ओळ सोडून ब गट सुरू होईल. त्याचा वेगळा रंग असेल. त्यावर त्या गटातील उमेदवारांची नावे असतील. शेवटी नोटाचा पर्याय असेल. हीच रचना ड गटापर्यंत असेल. दोन मतदान यंत्रांवर सर्व उमेदवारांची नावे बसली नाहीत तर तिसरे यंत्र वापरण्यात येईल. (प्रतिनिधी)