शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 19:09 IST

राजगुरुनगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्यासमोर पुणे-नाशिक महामार्गावर पाषणकर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिली

राजगुरूनगर:पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वृध्दाचा जागीच मुत्यू झाला. पांडुरंग विठोबा पाषाणकर (वय ६०) साबुर्डी (ता. खेड) असे मृत्यू झालेल्या वृद्ध शेतकऱ्यांचे नाव आहे. ही घटना दुपारी सव्वाचार वाजता घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी, मयत पाषाणकर बटाटा बियाणे आणण्यासाठी आले होते.

राजगुरुनगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्यासमोर पुणे-नाशिक महामार्गावर पाषणकर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिली. पाषणकर यांच्या पोटावरून चाक गेल्याने जागीच मुत्यू झाला. घटनास्थळी तत्काळ योगेश शिंदे व बाळा भांबुरे रुग्णवाहिका नेऊन पाषाणकर यांना खाजगी रुग्णालयात आणले. गंभीर जखमी असल्याने उपचारापूर्वी पाषाणकर यांचा मूत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हुतात्मा राजगुरु यांच्या स्मृती शिल्पासमोर हा अपघात झाला. या ठिकाणी नेहमी वर्दळ व वाहतुक पोलिस असतात. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाडीधारक, फळे विक्रेते आहेत. मात्र अपघात दरम्यान रस्त्याच्या एका बाजूला दोन वाहने ऐकमेकांना घासल्यामुळे त्या वाहन चालकांची बाचाबाची सुरु होती. त्यामुळे त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी होऊन वाहतुक बंद होती. हाकेच्या अंतरावर वाहतुक पोलिसांची केबीन आहे. मात्र वाहतुक पोलिस केबीनमध्ये आराम करीत होते. त्यामुळे अपघात करून वाहनचालक निघून गेला. अशी प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी