शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तांबट आळीची परंपरा माहित व्हावी, म्हणून उभारलं संग्रहालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 17:12 IST

पुण्यातल्या गिरीश पोटफोडे यांचा उपक्रम

ठळक मुद्देसंग्रहालयात तब्बल चारशे वस्तूंचे प्रदर्शन

पुण्यातली तांबट आळी ही प्रसिद्ध. पण कमी झालेली मागणी आणि त्याच बरोबर इतर व्यवसायात कडे वळलेले लोक ,यामुळे इथली खासियत असणाऱ्या जुन्या वस्तू कमी होत गेल्या. इथली संस्कृती इथली खासियत जिवंत रहावी आणि लोकांना कळावी यासाठी इथलेच एक रहिवासी धडपडताहेत. आनंदी संसार या नावाने त्यांनी इथल्या या जवळपास चारशे वस्तूंचं प्रदर्शन उभारले आहे.

कसबा पेठेत राहणारे गिरीश पोटफोडे शिक्षण पूर्ण झाले तसे नोकरीला टाटा मोटर्स मध्ये फायनान्स विभागात त्यांनी अनेक वर्ष नोकरी केली. मात्र तांबट आळीतल्या वस्तूंची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच त्वष्टा कासार मंडळाच्या गणेश उत्सवाच्या शंभर वर्षाच्या निमित्ताने एक प्रदर्शन भरवलं गेलं. त्यावेळी मांडलेल्या वस्तू बघून पोटफोडे यांची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातच टुडे रिटायर ही झाले आणि मग त्यांनी आपल्या आवडी कडेच लक्ष द्यायचे ठरवले. आणि यातूनच उभा राहिला आनंदी संसार. 

पण अर्थातच ही जुनी भांडी गोळा करणे सोपं नव्हतं . काही भांडी माझ्या घरातच होती. अगदी आजी च्या काळातले घंगाळे, बंब, अशा काही वस्तू. पण इतरही आणि वस्तू गोळा करायच्या होत्या. त्यासाठी मग परिसरातल्या ओळखीच्या लोकांपासून ते अगदी जुन्या बाजारापर्यंत सगळीकडच्या फेर्‍या झाल्या. एक एक करत वस्तू गोळा होत गेल्या आणि त्यातूनच हे घरगुती प्रदर्शन उभ राहिल्याचं पोटफोडे सांगतात.  

आत्ता त्यांच्याकडे मोठा लहान असे बंब अष्टविनायक तांब्या भांडे ठोक्याचे ग्लास जग चहाची किटली शाळेचा डबा मानाच्या पेट्या सुरमा लावणी ,प्रवासी तांब्या बर्नर, टाळ, वजन, वजन काटा, अशा अनेक वस्तू गोळ्या झाल्या आहेत याचं त्यांनी घरातल्या घरात एक प्रदर्शनही उभे केले आहे. यासाठी पदरचे दोन लाख रुपये त्यांनी खर्च केले आहेत. हे सगळं कशासाठी हे सांगताना पोटफोडे म्हणाले, " पूर्वी आमच्या तांबट आळीत तांब्या-पितळेची भांडी बनवणाऱ्या लोकांची जवळपास तीनशे घरं आणि कारखाने होते. पण आता त्यातले तीस शिल्लक राहिलेत. त्यातही अनेक जण अँटिक वस्तूंकडे वळले आहेत. त्यामुळे जुन्या पारंपरिक वस्तू नेमक्या होत्या कश्या आणि त्या मिळतात कुठे हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी हे प्रदर्शन उभारले. माझ्या प्रदर्शनात कोण काय बनवतो याची माहिती आहे. जेणेकरून लोक ते थेट खरेदी करू शकतील."

सध्या कोरोनामुळे बंद असलं तरी एरवी पोटफोडे यांच्या कसबा पेठेतल्या घरी हे प्रदर्शन जाऊन पाहता येतं. याचं एक मोठं संग्रहालय करण्याची त्यांची इच्छा आहे.

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकWomenमहिला