शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

गुुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण; कुख्यात गुंड गजानन मारणे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 15:17 IST

तळोजा कारागृह ते कोथरुड अशा वाहनांच्या ताफ्याचे व्हिडिओ क्लीप व्हायरल करुन पुण्यातील नागरिकांच्या मनामध्ये दहशत बसविली.

पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण करुन दहशत निर्माण करणार्या गजानन मारणे व त्याच्या समर्थकावर आणखी एक गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन मारणे हा गुंड असून त्याच्यावर खुन, गर्दी, मारामारी, खंडणी वगैरेसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. परस्परविरोधी टोळी यद्धातून अनेकांचे खून झालेले आहे. गजा मारणेप्रमाणेच त्याचा विरोधी टोळी प्रमुख बाहेर असून त्यांच्यावर दहशत बसावी व जनतेवर दहशत बसावी, जेणेकरुन त्याच्या दृष्टकृत्यास कोणी आड येणार नाही. म्हणून त्यांचे समर्थकाकरवी जनतेच्या मनामध्ये दहशत रहावी म्हणून कट करुन युट्युब, फेसबुक, इन्स्ट्राग्रामवर अशा माध्यमातून त्यांनी नियोजनपूर्वक तळोजा कारागृह ते कोथरुड अशा वाहनांच्या ताफ्याचे व्हिडिओ क्लीप व्हायरल करुन, त्यावर कमेंटपोस्ट करुन व लाईक करुन पुण्यातील नागरिकांच्या मनामध्ये दहशत बसविली. त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होईल असे वातावरण तयार केले.

मारणे याच्याविरुद्ध ७ गुन्हे प्रलंबित आहेत. या प्रलंबित केसमधील साक्षीदार, अन्यायग्रस्त, तक्रारदार यांच्या मनात वाजवी भिती तयार करणे.नागरिकांच्या मनात भीती कायम राहण्यासाठी सुनियोजित प्रयत्न केल्याचा पोलिसांचा कयास आहे. मारणे याने सोशल मीडियावर सहकारी व समर्थकांकरवी टाकलेले व्हिडिओ व त्यावरील सोशल मीडियावरील व्यक्त होणारी मते, प्रतिक्रिया गुन्हेगारी स्वरुपाच्या, कायद्याचे अनादर करणाऱ्या बेकायदेशीर प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे असून गुन्हेगारी स्वरुपाच्या, कायद्याचे अनादर करणाऱ्या बेकायदेशीर प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे असून, गुन्हेगारी प्रवृत्तीचे सोशल मीडियाचा वापर करुन उदात्तीकरण होत आहे.

गजानन मारणे, त्याची आय टी टीम, नमुद युट्युब, फेसबुक, इन्स्ट्राग्रामचे प्रोफाईलधारक या सर्वाविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाप्रकारे जर कोणीही व्यक्ती आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण सोशल मीडियाचा वापर करुन करत असेल, लोकांमध्ये आपली दशहत निर्माण करत असेल व अशा बेकायदेशीर कृत्य करणार्या व्यक्तींना कोणी प्रत्यक्ष किंवा सोशल मिडियामध्ये त्याचे बाजूने कमेंटस करुन प्रोत्साहन देत असेल त्यांच्यावर पुणे शहर पोलीस कडक कायदेशीर कारवाई करतील. व नागरिकांना भयमुक्त वातावरण उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देत आहे, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcommissionerआयुक्त