शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या ताणामुळेच चालक व्यसनाधीन

By admin | Updated: May 14, 2015 04:13 IST

पुण्यातील अरुंद रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी यामुळे पीएमपी बसचालकांना बस चालविताना मोठ्या दिव्यातून जावे लागते.

पुणे : पुण्यातील अरुंद रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी यामुळे पीएमपी बसचालकांना बस चालविताना मोठ्या दिव्यातून जावे लागते. परिणामी कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पीएमपीचे बसचालक व्यसनांच्या आहारी जात असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाने बसचालकांना व्यसनाधीनतेपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे.प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर मॉडर्न महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातील विलास महाडिक या विद्यार्थ्याने सहायक प्राध्यापक साईराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमपीच्या चालकांविषयी संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. मोकळेपणाने बोलणारे, अबोला धरणारे, तसेच स्वत:च्या कामाप्रती निष्ठा ठेवून काम करणारे अशी वर्गवारी करून महाडिक या विद्यार्थ्याने सुमारे १२० बसचालकांशी संवाद साधला. अनेक चालक कामाचा ताण घालविण्यासाठी तंबाखू, मद्य, सिगारेट यांचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे. मद्यपान करणाऱ्या चालकांची टक्केवारी १२.५ असून, सर्वसाधारणपणे मद्य घेणाऱ्यांची टक्केवारी ६६.६७ टक्के तर कधीतरी मद्यपान करणाऱ्यांची टक्केवारी २०.८३ आहे.संस्थेने युवा संशोधन योजना सुरू केली आहे. पाच वेगवेगळ्या संशोधन प्रकल्पांवर ५० विद्यार्थ्यांनी संशोधन केले. त्यातीलच एका प्रकल्पावर महाडिक या विद्यार्थ्याने ‘बसचालकाचे व्यक्तिमत्त्व आणि ताण’ या विषयावर संशोधन केले. पीएमपीमधून दररोज प्रवास करत असल्यामुळे पीएमपीच्या बसचालकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते. विलास महाडिक या विद्यार्थ्याने त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबत संशोधन प्रकल्प तयार केला असून, लवकरच हा प्रकल्प पीएमपी प्रशासनाला सादर केला जाणार आहे.