शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या विविध विभागांचे पुरामुळे ५० कोटींच्या पुढे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 07:00 IST

शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांनाही पुराचा तडाखा

ठळक मुद्देपथ, मल:निस्सारण, विद्यूत, उद्यान, पाणी पुरवठा, भवन आदी विभागांचे ५० कोटींपेक्षा अधिक नुकसानलोकशाहीर आण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये पाणी शिरल्याने वातानुकुलीत यंत्रणा बंद

पुणे : शहरात अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे जसे खासगी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तसेच महापालिकेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पथ, मल:निस्सारण, विद्यूत, उद्यान, पाणी पुरवठा, भवन आदी विभागांचे ५० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दुरुस्ती करण्यासाठी या सर्व विभागांकडून खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत असून नुकसानीची एकत्रित माहिती गोळा करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरुवात केली आहे. पुरामुळे शहरातील नाल्यांवर आणि मोठ्या ओढ्यांवर असलेले कलव्हर्ट वाहून गेले होते. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून रस्त्यांचे नुकसानही झाले आहे. यासोबतच, जवळपास सहा किलोमीटरच्या मल:निस्सारण वाहिन्या खराब झाल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाच्या जलवाहिन्या आणि पंपांचेही मोठे नुकसान झाले आहे. पद्मावती पंपिंग स्टेशनमध्येही मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे येथील विद्यूत व्यवस्थाही नादुरुस्त झाली होती. यासोबतच उद्यान विभागाच्या अखत्यारीतील कात्रज प्राणी संग्रहालयाची सीमाभिंत पडली होती. या भिंतीचा खर्च दोन कोटींपेक्षा अधिक होणार आहे. यासोबतच नाला उद्याने आणि अन्य उद्यानांचेही पुरामध्ये नुकसान झाले आहे. झाडे, उद्यानांमधील वस्तू, खेळणी पुरामध्ये वाहून गेली. यासोबतच पालिकेच्या मालकीच्या इमारतींच्या सीमाभिंती पडल्या. इमारतींचे नुकसान झाले. स्मशानभूमी, दफनभूमींसह सार्वजनिक इमारतींना पुराचा फटका बसला. अनेक ठिकाणी पुराच्या तडाख्यात विद्यूत खांब उन्मळून पडले. केबल्सचे नुकसान झाले. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये पाणी शिरल्याने वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली. ती अद्यापही सुरु झालेली नाही. यासोबतच पंखेही बंद पडले होते. विद्यूत विभागाने हे पंखे सुरु केले. परंतू, एसीच्या दुरुस्तीला मोठा खर्च येणार असल्याने त्याचे काम रखडले आहे. यासोबतच शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांनाही पुराचा तडाखा बसला होता. याभागातील पालिकेची उद्याने, शाळा, व्यायामशाळा, मल:निस्सारण आणि जलवाहिन्यांनाही त्याचा फटका बसला आहे. पालिकेच्या या सर्व विभागांनी आपले झालेले नुकसान आणि त्याच्या दुरुस्तीसाठी येणारा खर्च याचे अंदाजपत्रक तयार केले आहे. ही माहिती आपत्कालीन विभागाकडून एकत्रित करण्यात येत असून ही माहिती अतिरीक्त आयुक्तांना सादर केली जाणार आहे. ==== पुराच्या घटनेला दोन महिने होत आले तरी प्रशासनाने अद्यापही सर्व विभागांच्या नुकसानीचा एकत्रित आकडा काढलेला नाही. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून अतिरीक्त आयुक्तांच्या आदेशानंतर हा आकडा एकत्रित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.====विभाग                                   दुरुस्तीसाठी येणारा अंदाजे खर्चपथ                                             १५ ते २० कोटीमल:निस्सारण                            ७ कोटीविद्यूत विभाग                            २ कोटीउद्यान विभाग                             ५ कोटीपाणी पुरवठा                            दीड ते दोन कोटीभवन विभाग                          ७ कोटी २० लाख

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfloodपूरRainपाऊस