पुण्यात दहावीच्या गणित प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा; राज्य मंडळाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:55 IST2026-03-13T12:53:37+5:302026-03-13T12:55:40+5:30

परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहावीच्या कोणत्याही विषयाची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर उपलब्ध झाल्याचे आढळून आलेले नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे

Discussion about the leak of 10th class math question papers in Pune; State Board clarifies | पुण्यात दहावीच्या गणित प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा; राज्य मंडळाचे स्पष्टीकरण

पुण्यात दहावीच्या गणित प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा; राज्य मंडळाचे स्पष्टीकरण

पुणे : दहावीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर आधीच प्रसारित झाल्याची चर्चा सुरू असली, तरी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याची कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे मंडळाने प्रसिद्धिपत्राद्वारे स्पष्ट केले.

समाजमाध्यमांवरील काही समूहांमध्ये गणित भाग- १, गणित भाग-२ तसेच विज्ञान भाग- १ या विषयांच्या प्रश्नपत्रिका आधीच उपलब्ध झाल्याचे संदेश फिरत असल्याची माहिती ९ मार्च रोजी राज्य मंडळाकडे आली होती. त्यानंतर संबंधित दुव्यांची तपासणी करण्यात आली. तपासात ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६’ या नावाच्या टेलिग्राम समूहावर गणित भाग-१ प्रश्नपत्रिका आधीच प्रसारित झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष पडताळणीत परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याचे आढळून आले नाही.

दरम्यान, पुणे विभागीय कार्यालयातील अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी गणित भाग-१ आणि भाग-२ या प्रश्नपत्रिका टेलिग्राम समूहावर प्रसारित झाल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार टेलिग्राम समूहाच्या प्रशासकासह संबंधित सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. राज्य मंडळाने स्पष्ट केले की, परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहावीच्या कोणत्याही विषयाची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर उपलब्ध झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चांना विद्यार्थ्यांनी व पालकांनी बळी पडू नये, असे आवाहनही मंडळाने केले आहे.

Web Title : पुणे: दसवीं गणित पेपर लीक अफवाहों का खंडन; बोर्ड का स्पष्टीकरण।

Web Summary : महाराष्ट्र बोर्ड ने सोशल मीडिया पर प्रसारित दसवीं गणित पेपर लीक अफवाहों का खंडन किया। जांच में परीक्षा से पहले उपलब्धता का कोई सबूत नहीं मिला। पुलिस टेलीग्राम समूह गतिविधि की जांच कर रही है। छात्रों और अभिभावकों से झूठे दावों को अनदेखा करने का आग्रह किया।

Web Title : Pune: Tenth-grade math paper leak rumors refuted; board clarifies.

Web Summary : Maharashtra board denies tenth-grade math paper leak rumors circulating on social media. An investigation revealed no evidence of pre-exam availability. Police are investigating Telegram group activity. Students and parents urged to disregard false claims.