शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात कर्तव्य पार पाडूनही मानधनापासून वंचित; जिल्हा परिषदेवर आशा सेविकांचा धडक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 17:46 IST

कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता सेविकांनी सर्वेक्षणाची जबाबदारी पार पाडली. मात्र, शासनाने कदर न करता त्रोटक मानधन दिले..

ठळक मुद्देविविध मागण्यांचे दिले निवेदन

पुणे : कोरोना काळात जिवाची पर्वा न करता थेट घरोघरी जाऊन कोरोना बाधितांचे सर्वेक्षण करणाऱ्या आशा सेविका हक्काच्या मानधनापासून वंचित राहिल्या आहेत. त्यात शासनाने पुन्हा क्षयरूग्णांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी दिल्याने आशा सेविकांनी रौद्ररूप धारण करत शुक्रवारी थेट जिल्हा परिषदेवर धडकल्या. वाढीव मानधनाबरोबर अन्य मागण्या पूर्ण झाल्याशिवाय सर्वेक्षण करणार नसल्याची भूमिका घेत त्यांनी धरणे आंदोलन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारत लवकर त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची धुरा आशा सेविका आणि गटप्रवर्तकांवर आहे. मात्र, त्यांना कामावर आधारित मोबदला दिला जाताे. जो मोबदला मिळतो तोडका असल्यानेने तो जादा मिळावा. कोरोना काळात जिवाची पर्वा न करता सेविकांनी सर्वेक्षणाची जबाबदारी पार पाडली. मात्र, शासनाने कदर न करता त्रोटक मानधन दिले. आरोग्य केंद्रात मिळणारी वागणूक अपमान जनक असल्याने, तसेच सहनशिलतेचा अंत झाल्याने आशा सेविकांनी आपल्हा हक्कासाठी एल्गार पुकारत थेट जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी वाढीव मानधन काढतांना ते सरसकट २ हजार ते ३ हजार रूपये द्यावे, गटप्रवर्तक व आशा सेविकांना अतिरिक्त बैठकांसाठी मानधन द्यावे, ते पूर्ण वर्षाचे काढावे, गटप्रवर्तकांना शारदाग्राम आणि एच.बी.एन.सी मानधन द्यावे या सारख्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारत लवकर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात महाराष्ट्र आशा-गट प्रवर्तक वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा स्वाती धअयगुडे, सरचिटणीस श्रीमंत घोडके, सीमा, मालुसरे आदी उपस्थित होते.

---तर सर्वेक्षण करणार नाहीआशा सेविकांना मिळणारी वागणूक चुकीची आहे. मानधन कमी असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्या तुलनेत कामे जास्त असतात. यामुळे रोज १५० रूपये अनुदान मिळत असेल तरच आम्ही सर्वेक्षण करू, अन्यथा सर्व सर्वेक्षणातून माघार घेऊ अशी भूमिका आंदोलकांनी घेतली....... 

जिल्ह्यातील आरोग्याची जबाबदारी आशा सेविकांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. कोरोना काळात केलेले काम कौतूकास्पद आहे. त्यांच्या मागण्या या शासन दरबारी पाठवून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाzpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या